शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीचा निषेध, काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 07:05 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ लवकरच भाजपा सरकारने कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सोमवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला.

कल्याण : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ लवकरच भाजपा सरकारने कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सोमवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला.दरवाढीबाबत भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाणhttp://www.lokmat.com/topics/ashok-chavan/ यांच्या आदेशानुसार काँग्रेसने कल्याण तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. पश्चिमेतील सहजानंद चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. तो महंमद अली चौकातून जाऊन तहसीलदार कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकरी बैलगाड्या आणि टांगे घेऊन आले होते. बैलगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार संजय दत्त आणि कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नायब तहसीलदार अभिजित खोले यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या मुद्यासह बेरोजगारी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांकडेही मोर्चात लक्ष वेधण्यात आले होते. या मोर्चात दत्त आणि पोटे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते आर.बी. सिंह, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते ब्रीजकिशोर दत्त, कल्याण शहर जिल्हा महिलाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, प्रदेश पदाधिकारी संतोष केणे, केडीएमसीतील पक्षाचे गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल पंडित, माजी नगरसेविका शारदा पाटील, रत्नप्रभा म्हात्रे, परिवहनचे माजी सदस्य आरिफ पठाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अमित म्हात्रे, परिवहनचे माजी सभापती गंगाराम शेलार, शकील खान आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपाने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्याबाबत, त्यांच्या मनातील रोष मोर्चात व्यक्त केल्याचे पोटे यांनी सांगितले.सरकार निष्क्रियकेंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोल, डिझेल भाव ४० ते ५० प्रतिलीटर रुपयांपर्यंत होते. त्यावेळी भाजपाची मंडळी विरोधाची भूमिका घेत. परंतु, आज जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भाजपा सरकार निष्क्रिय ठरले असून नागरिक त्रस्त आहेत, असे दत्त यांनी सांगितले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसthaneठाणेkalyanकल्याण