शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

‘बारवी’त वाढीव पाणीसाठा?

By admin | Updated: July 11, 2016 02:00 IST

मुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले

पंकज पाटील,  अंबरनाथमुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले तरी अद्याप या धरणात अतिरिक्त पाणीसाठा साठवलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून तेथे वाढीव पाणीसाठा साठवण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढवली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची ९ मीटर वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाच्या उंचीवाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपालिकांना पाण्याची गरज भासणार आहे, अशा महापालिका आणि नगरपालिकांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यासोबत, त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत, त्या मान्य करून ती गावे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून येथे वाढीव पाणी साठवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकारी उघडपणे बोलत नसले तरी यंदाच्या पावसाळ्यात वाढीव पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हास नदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो धरणात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यावरच जिल्ह्याची तहान भागेल.