शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री कार्यकर्त्यांचा वधारला भाव ;२०० ऐवजी आता ५०० रुपयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 02:03 IST

इंधन दरवाढीमुळे आधीच उमेदवारांचे कंबरडे मोडले असतांना आता प्रचारासाठी लागणा-या भाडोत्री कार्यकर्त्यांचेही पॅकेज तयार आहे.

- अजित मांडकेठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि अर्ज भरण्याची प्रक्रियाही आता संपली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार आहे. परंतु, या निवडणुकीत प्रचार करणाºया ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांनाही मंदीचे चटके भासू लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपला भाव वाढविला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खाऊनपिऊन २०० रुपये असणारा या कार्यकर्त्यांचा दर आता ५०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता या निवडणुकीच्या माध्यमातून आपली मंदी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला मात्र या दरवाढीचा फटका बसला आहे.लोकसभेनंतर सहा महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले आहेत. अर्ज भरताना अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच मंगळवारपासून खºया अर्थाने प्रचार रॅली, रोड शो, सभा आदींसह इतर प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला ‘त्या’ कार्यकर्त्याची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधीपासूनच या कार्यकर्त्यांचे बुकिंग केले असून त्यांचे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हातात झेंडा घेऊन ‘आवाज कुणाचा’, ‘निवडून निवडून येणार कोण’, ‘बघतोस काय रागाने’ अशा घोषणा देणाºया त्या कार्यकर्त्यांना दिवसाचे २०० रुपये मिळत होते. यामध्ये काही ठिकाणी चहा, नाश्ता, जेवणही मिळत होते. परंतु, आता देशभर मंदीचे सावट आल्याने या मंदीतून सावरण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनीही आपला भाव वाढवला आहे. आता खाऊनपिऊन ५०० रुपयांचा भाव सुरू असल्याची माहिती आहे. मतदारसंघातील तगड्या उमेदवाराकडे भाडोत्री कार्यकर्त्यांची रीघ लागलेली दिसून येत आहे. पुन्हा निवडणूक लागलीच नसल्याने हीच संधी आहे.ठेकेदारांचे रेटकार्डइंधन दरवाढीमुळे आधीच उमेदवारांचे कंबरडे मोडले असतांना आता प्रचारासाठी लागणा-या भाडोत्री कार्यकर्त्यांचेही पॅकेज तयार आहे. पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे पॅकज तयार आहे. थेट पॅकेजमध्ये काही प्रमाणात दर कमी केला जात आहे. तसेच किती कार्यकर्ते हवेत, कोणते हवेत, महिला, तरुण, जेष्ठ आदींचीही यादी तयार आहे. त्यानुसार उमेदवाराला जे परवडेल ते मिळत आहे.

टॅग्स :thane-acठाणे शहर