शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

काेविड काळात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:39 IST

घरगुती मध्यम आकाराच्या झाडांना पसंती

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच ठिकठिकाणच्या आयुर्वेद वैद्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आधीच्या टप्प्यात तुळस लावण्याकडे गृहिणींचा ओढा होता. मात्र, आता काही महिन्यांपासून ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मागणी वाढली असून ती झाडे घरोघरी लावण्याचा नवा ट्रेंड झाला असल्याचे नर्सरी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

कल्याण, डोंबिवली येथील नर्सरी व्यावसायिकाने याबाबत सांगितले की, तुळशीच्या रोपांना मागणी वाढेल, असे वाटले होते. कोविडच्या पहिल्या टप्प्यात काढा करून पिणे, वाफ घेणे तसेच गरम पाण्यात तुळस टाकून त्याद्वारे घसा शेकणे यासाठी दूध-हळदीप्रमाणे तुळशीची मागणी वाढेल, असे वाटले होते. पण, तसे झाले नाही. तसेच अश्वगंधा झाडाचीही मागणी वाढलेली नाही.ऑक्सिजनची जसजशी मागणी वाढू लागली. कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर झपाट्याने ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना मागणी असल्याचे दिसून आले. विशेषतः कल्याण येथील नर्सरी व्यावसायिकांनी याबाबतची माहिती दिली. आयुर्वेदिक शास्त्रीय कारण सांगत ऑक्सिजन देणारे झाड घरात लावण्यात येत आहेत. यामध्ये मध्यम आकारांच्या झाडांना, राेपांना पसंती देण्यात येत आहे.

या झाडांना मागणीपिस लिली, स्नेक प्लांट, मनी प्लांट, झमिया प्लांट, कडुनिंब, निलगिरी, ॲलोव्हेरा, रबर प्लांट, तुळशी, स्पायडर प्लांट, बांबूची राेपे, अरेका पाल्म यांना मागणी वाढली आहे.

तुळशीला फारशी मागणी वाढलेली नाही. कोविडच्या सुरुवातीच्या काळात तसे वाटले होते. पण ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना तुलनेने मागणी काही महिन्यांपासून जास्त वाढलेली आहे. घरात हे झाड लावायचे असल्याने मध्यम आकाराच्या स्वरूपात वाढलेले झाड, कुंड्या मागण्यात येत आहेत.    - प्रसाद पाठारे, भागीदार, पाठारे नर्सरी, कल्याण

तुळशीला फारशी मागणी नाही. जे हातगाडी विक्रेते असतात ते नेहमीप्रमाणे तुळशीची रोप नेतात. पण विशेष म्हणून कोणी नागरिक येत नाहीत. आता तर लॉकडाऊन असल्याने नर्सरीच्या आत नागरिकांना येऊ दिले जात नाही. जे येतात त्यांना मागणीनुसार झाडं दिली जातात. त्यात सगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश असतो.    - चौधरी नर्सरीवाले, चोळेगाव-ठाकुर्ली

 

टॅग्स :thaneठाणे