शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:36 IST

अश्विनी शेंडे यांचे मत : मकरोत्सवामध्ये रंगला ‘शब्दांचा कॅफे’

डोंबिवली : गीत लिहिताना सर्वसामान्यांना समजतील, असे सोपे शब्द वापरण्याचा आग्रह धरला जातो. मात्र, मराठी भाषेत मोठे शब्दसामर्थ्य आहे. त्यातील चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. हे शब्दच वापरले नाहीत, तर मराठी भाषा टिकणार कशी? त्यामुळे हे शब्द वापरले पाहिजेत. मराठी भाषा जगली तरच मराठी शाळा तग धरतील, असे मत सुप्रसिद्ध गीतकार व लेखिका अश्विनी शेंडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी झालेल्या मकरोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘शब्दांचा कॅफे’मध्ये शेंडे बोलत होत्या. यंदाचे महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. टिळकनगर शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. अनेक मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटांची शीर्षकगीते, पथकथा व संवाद लिखाण करणाऱ्या अश्विनी शेंडे यांच्याशी अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी संवाद साधला. यावेळी मालिकांची शीर्षकगीते आणि गाणी जयदीप बगवाडकर आणि योगिता गोडबोले यांनी सादर केली. संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.शेंडे म्हणाल्या की, प्रेक्षकांच्या मनाला साधेपणा जास्त भावतो. पण, सारखे साधे लिहिले तर चांगले मराठी शब्द कसे कळणार? सतत सोपे लिहून आपणच आपल्या भाषेचा दर्जा कमी करत आहोत. ‘लोकमत सखी मंच’च्या एका कार्यक्रमात एक बाई आपल्या मुलीला घेऊन आली. त्यांनी तुमच्या गीतातील काही शब्द कठीण वाटतात, असे सांगितले. त्यांनी ‘कवडसा’ या शब्दाचा अर्थ कवड्या असा लावला. मग, त्या मुलीला आणि तिच्या आईला कवडसाचा अर्थ समजून सांगितला. हा शब्द वापरला नसता तर त्यांना समजला नसता. नवीन पिढीला ते शब्द समजावेत, यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. मालिकेचे शीर्षकगीत लिहिताना त्यात त्या शीर्षकाचा शब्द असावा, असा आग्रह असतो. त्यामागे प्रेक्षकांना कोणती मालिका सुरू आहे, हे कळावे, हा उद्देश असतो. वेगळ्या विषयांवरील मालिकांची शीर्षकगीते लिहिण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या क्षेत्रात मी गुलजार यांना आपला गुरू मानते, असेही त्यांनी सांगितले. ते जुन्या कल्पना नवीन स्वरूपात मांडतात. त्यामुळे त्यांचे गीत किंवा कविता मनाला भिडते. केवळ रोमॅण्टिक गाणी लिहितो, असा शिक्का बसू नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लिखाण करण्याचा प्रयत्न केला. त्यात पंढरीची वारी आणि विशेष मुलांची वारी या दोन्हींचा वापर केलेले ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो’ हे गीत तयार केले, असे त्यांनी सांगितले.

गुलजार यांच्या गीतांवर आधारित नवीन कार्यक्रम घेऊन येत असल्याचे बगवाडकर यांनी सांगितले. त्यानंतर, त्याची झलक ही गायकांनी दाखवली. ‘मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना’ आणि ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज है’ ही दोन गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

टॅग्स :marathiमराठी