लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्जबाजारी झाल्यामुळे सोनसाखळीसाठी अक्षय डाकी या आपल्याच मित्राचा खून करणाºया धनराज तरुडे (३३) या मुख्य आरोपीला ठाणे न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसे, याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.धनराज याने कृष्णा घोडके (२०) आणि चंदन पासवान (२०) या दोन मजुरांना प्रत्येकी पाच हजारांचे आमिष दाखवून त्याचा मित्र अक्षयची सोनसाखळी बळकावण्यासाठी त्याचा दोरीने गळा आवळून ४ सप्टेंबर रोजी खून केला होता. या प्रकरणात सुरुवातीला धनराजला, तर नंतर घोडके आणि पासवान या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. धनराजला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यामुळे त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सोनसाखळीसाठी खून करणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:56 IST
सोनसाखळीसाठी अक्षय डाकी या आपल्याच मित्राचा खून करणा-या धनराज तरुडे (३३) या मुख्य आरोपीला ठाणे न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोनसाखळीसाठी खून करणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ
ठळक मुद्देठाण्यातील घटनाआणखी असे गुन्हे केले आहेत का? याचाही कासारवडवली पोलीस करणार तपास