शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी चित्रातील ‘बिबट्या’ ठोकतोय धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:17 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अवघे ५० टक्के मतदान झाले होते.

ठाणे : गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अवघे ५० टक्के मतदान झाले होते. फारच कमी झालेला मतदानाचा हा टक्का या निवडणुकीत वाढवण्यासाठी यंदा जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेने मोठ्या प्रमाणात जनजागृतीचा फंडा निवडला आहे. मतदान कमी झालेल्या विधानसभा कार्यक्षेत्रात ही जनजागृती विविध पद्धतीने करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यात हलगर्जीपणा नको म्हणून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील हे केंद्रीय निरीक्षक म्हणून लक्ष ठेवून आहेत.ठाणे शहर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजून घेण्यासाठी सर्वच त्याकडे गांभीर्याने लक्ष देतात. याची जाणीव झालेल्या निवडणूक यंत्रणेनेदेखील मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी बिबट्याचे कार्टुन अर्थात चित्राचा आयकॉन निश्चित केला आहे.बिबट्याच्या या चित्रासह नागरिकांना आकर्षित करणाºया विविध उपक्रमांद्वारे मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृती सुरू असल्याचे या जनजागृती पथकाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेत निवडणूक शाखा जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आदी उपस्थित होते.गेल्या निवडणुकीला जिल्ह्णातील भिवंडी ग्रामीण (६६.२३ टक्के), शहापूर (६५.७८ टक्के) आणि मुरबाड (६३.३३ टक्के) या तीन विधानसभांमध्येच जास्त मतदान झाले. उर्वरित विधानसभांमध्ये अत्यल्प मतदान झाले आहे. याकडे लक्ष केंद्रित करून उल्हासनगर (३८ टक्के), अंबरनाथ (३९ टक्के), भिवंडी ईस्ट (४४ टक्के), डोंबिवली (४४ टक्के), कळवा-मुंब्रा (४७ टक्के), कल्याण (४४ टक्के) आदी विधानसभांमध्ये कमी मतदान झाले. यामुळे या विधानसभा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत कमीतकमी ७० टक्के मतदान व्हावे, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली आहे.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत.।असा आहे स्वीप उपक्रममतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्ह्णातील २४ हजार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती सुरू असून त्यासाठी ९८ रोटरी क्लबचेदेखील सहकार्य घेतले जात आहे. ठिकठिकाणी जाणाºया घंटागाडीद्वारे मतदान करण्याचे आवाहन करणारे आॅडिओ लोकांना ऐकवण्यात येणार आहेत. तसेच रिक्षाच्या माध्यमातून ते ऐकवण्यात येणार आहेत. शिवाय, एसटी महामंडळाच्या ६०० कर्मचाऱ्यांद्वारे मंगळवारी शहरात जनजागृती करण्यात आली. १९ एप्रिलला रन फॉर व्होटर... ही तीन किमीची रॅली शहरात काढण्यात येणार आहे. तसेच २२ ते २७ दरम्यान कल्याण मतदारसंघात १० ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असून २१ एप्रिलला उल्हासनगर, डोंबिवली, मुंब्रा, भिवंडी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. २४ ला फ्लॅशमॉबद्वारे युवकांचे डान्स कार्यक्रम आणि २७ ते २८ या कालावधीत ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले आदींची ठिकठिकाणी रॅली काढून मतदानासाठी जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे