शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार वाहन चालकांना रोखण्यासाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 11:07 IST

पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे पालिका आयुक्तांना पत्र

ठळक मुद्दे२७ जानेवारी रोजी पहाटे उपवन परिसरात टाटा लॅण्ड क्रुझर या गाडीने झाडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तर, वाहन चालविणारी तरूणी गंभीर जखमी झाली आहे.

ठाणेठाणे शहरातील रस्ते प्रशस्त झाल्याने वाहने वेगाने दामट्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. मनुष्यबळ मर्यादीत असल्याने प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे वाहतूक पोलिसांना शक्य नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या बेदरकारपणाला लगाम घालण्यासह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्हींचे नेटवर्क वाढविण्याची गरज पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ठाणे पालिका आयुक्त डाँ. विपिन शर्मा यांच्याकडे एका निविदनाव्दारे व्यक्त केली आहे.  

२७ जानेवारी रोजी पहाटे उपवन परिसरात टाटा लॅण्ड क्रुझर या गाडीने झाडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तर, वाहन चालविणारी तरूणी गंभीर जखमी झाली आहे. उपवन, येऊर, नव्याने तयार झालेल्या सुरेंद्र मिल कंपनी समोरचा रस्ता, घोडबंदर रोडरील नव्याने विस्तारणा-या वसाहतींमध्ये रँश ड्रायव्हींग प्रकार सातत्याने वाढू लागले आहेत. या भागात काही मोटारसायकलस्वार स्टंटही करतात. पोलिसांकडे त्याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, या परिसरात कायमस्वरुपी नजर ठेवणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हींचे जाळे विस्तारल्यास या रस्त्यांवरील प्रत्येक हालचाली पोलिसांना टिपता येतील. वेगाने वाहन दामटणा-या आणि  स्टंट करणा-या वाहतूक चालकांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच सोनसाखळी चोरी किंवा अन्य घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासही पोलिसांना या कँमे-यांची मदत होणार आहे.  

या कँमे-यांचे फिड वाहतूक नियंत्रण कक्षाशी जोडले जाईल. त्यामुळे पोलिसांना तिथल्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवणेही शक्य होईल. हे रस्त्यांवरील अपघात नक्की कुणाच्या चुकीमुळे झाला, मानवी चुकांव्यतिरीक्त अन्य कोणती कारणे त्यामागे होती का, भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याबाबत पोलिसांनी भूमिका घेणेही सुकर होणार आहे. तसेच, आपल्यावर कँमे-यांची नजर आहे हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करण्याचे प्रकारही कमी होतील, अशी आशा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून ई चलान पद्धतीने कारवाई केली जाते. सीसीटीव्ही कँमे-यांच्या मदतीने नियम मोडणा-या अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणेही शक्य होईल असेही बाळासाहेब पाटील यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाPoliceपोलिस