शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

मराठी भाषा वाढवा, पण इंग्रजीचीही कास धरा

By admin | Updated: October 13, 2016 03:33 IST

आताच्या काळात इंग्रजी भाषेची आवश्यकता असून ती जगात सर्वांना मान्य असलेली भाषा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार

डोंबिवली : आताच्या काळात इंग्रजी भाषेची आवश्यकता असून ती जगात सर्वांना मान्य असलेली भाषा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि कवितांचे समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी केले. मराठी ही आपली मातृभाषा असून ती शाळांशाळांमध्ये कशी वाढीस लागेल याचा विचार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेचे विकृतीकरण होत असल्याच्या प्रा. प्रवीण दवणे यांच्या भूमिकेसंदर्भात ते बोलत होते. दवणे हेही अध्यक्षपदाचे अन्य उमेदवार आहेत. डोंबिवलीतील ९० व्या साहित्य संमेलनाचा मीच अध्यक्ष होणार असून भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनासाठी आतापर्यंत मी योगदान दिले असून यापुढेही ते अधिकाधिक वृद्धींगत कसे होईल याकडे लक्ष देणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. दवणे यांनीही गेल्याच आठवड्यात नियंत्रक संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर काळे यांनीही अध्यक्षपदासाठी दावा केल्यानंतर काळे यांनीही बुधवारी डोंबिवलीत आगरी युथ पोरमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. सकारात्मक जीवनदृष्टी, निकोप साहित्यदृष्टी व तीक्ष्ण समीक्षादृष्टी हे साहित्यातले महत्वाचे गुण असून ते माझ्या लेखणीतून सर्वांनी सातत्याने अनुभवले आहेत. जेथे संमेलन होत आहे तेथे जाऊन तेथील साहित्य संपदेसह समाजरचनेचा आढावा घेण्यासाठी मुद्दामच डोंबिवलीत आल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनात केवळ साहित्य वृद्धीसाठीच योगदान दिले जावे. युवकांची साहित्यातील अभिरुची कशी वाढीस लागेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. संमेलनाचा खर्च पाच कोटींवर जाणार असल्याची माहिती मीही ऐकली आहे. त्या संदर्भातील सर्व जबाबदारी आयोजकांची असते. पण मी अध्यक्ष झालो तर संस्कृती, समाजभान, परंपरा आदींना महत्व देईल. त्याला बगल न देता साजेसे संमेलन पार पडण्यावर भर देईन, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. काळे यांची साहित्यसंपदा, त्यांनी भूषवलेली वेगवेगळी पदे यांची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)