शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या पाणी योजनेच्या तांत्रिक तपासणीची ४ कोटी ९४ लाखांची रक्कम योजनेच्या खर्चात समाविष्ट करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:10 IST

त्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने तयार केलेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत तांत्रिक तपासणी अहवाल शुल्क म्हणून ४ कोटी ९४ लाख रुपये महापालिकेस भरण्यास सांगण्यात आले आहे

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेसाठी सूर्या पाणी पुरवठा योजनेतून २१८ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असून सदर योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी करतानाच तांत्रिक तपासणी शुल्काची ४ कोटी ९४ लाखांची रक्कम एमआरडीएच्या योजना खर्चात समाविष्ट करावी अशी मागणी आमदार गीता जैन यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनां बाबत ४ फेब्रुवारी रोजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन विभाग, ठाणे येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत आ. गीता जैन यांनी मीरा भाईंदर शहराच्या पाणी समस्या व पाणी योजनां बाबत निवेदन दिले.

गेल्या अनेक वर्षां पासून सूर्या पाणी पुरवठा योजना रखडली असून ह्या योजनेतून शहराला २१८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होणार आहे . जेणे करून शहरातील नागरिकांची पाणी समस्या कामयमची संपुष्टात येणार आहे . शहरासाठी हि योजना महत्वाची असून अंतर्गत वितरणासाठी जलवाहिन्या टाकणे , जलकुंभ उभारणे आदी काम महापालिकेचे आहे . 

त्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने तयार केलेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत तांत्रिक तपासणी अहवाल शुल्क म्हणून ४ कोटी ९४ लाख रुपये महापालिकेस भरण्यास सांगण्यात आले आहे . पालिकेने २५ लाख रुपये अडा देखील केले आहेत . परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सदरची रक्कम एमआरडीएच्या मूळ योजनेच्या खर्चात समाविष्ट करावी अशी मागणी आ . गीता यांनी केली . त्यावर मंत्री गुलाबराव यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे आ. गीता यांनी म्हटले आहे. शहराला  महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळा कडून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्या मुळे शहरातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही . जेणे करून पाणी टंचाई भेडसावते . त्यावर लवकरच पाणी पुरवठा व मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिल्याचे आ. गीता जैन म्हणाल्या

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक