शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील घटना: अपघातानंतर एक तास रुग्णवाहिका न मिळाल्याने बांधकाम ठेकेदाराच्या मुलाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 02:14 IST

ठाण्यात मात्र अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका न मिळू शकल्याने कल्पेश शिवाजी गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी, ठाणे) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रसिद्ध ठेकेदार शिवाजी गायकवाड यांचा तो मुलगा होता.

ठळक मुद्देतीन हात नाका तुळजाभवानी मंदिराजवळील घटनागंभीर अवस्थेमध्येच पोलिसांनी नेले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यु ओढवत असल्याच्या अनेक घटना घडत आहे. ठाण्यात मात्र अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका न मिळू शकल्याने कल्पेश शिवाजी गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी, ठाणे) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश हा बाहेर चक्कर मारुन येतो असे सागून कल्पेश रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडीतील सिद्धी टॉवर येथील घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मुंबई- नाशिक पूर्व द्रूत गती मार्गावरील उड्डाण पूलावरुन भरघाव वेगातच तो मुंबईच्या दिशेने जात होता. पूलावरुन उतरल्यानंतर सेवा रस्त्याकडे वळत असतांनाच तुळजाभवानी मंदिारासमोर त्याची कार आली. त्यावेळी भरघाव वेगात असल्यामुळे कारवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने दोन वेगवेळया झाडांवर आदळून दुभाजकाला धडकून पदपथावर कार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, तो कारच्या बाहेर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बराच वेळ रस्त्यावरच होता. नंतर काही नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तिथून जाणाऱ्या काही रुग्णवाहिकांनाही हाताने इशारा केला. मात्र, १०.४० ते ११.४८ या एक तासाच्या अवधीमध्ये तिथून गेलेल्या तीनपैकी एकही रुग्णवाहिका त्याठिकाणी थांबली नाही. याच दरम्यान, नौपाडा पोलिसांच्या बिट मार्शलनेही रुग्णवाहिका थांबविण्याचा प्रयत्न केला. अखेर ११.४८ वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका रुग्णवाहिकेमधून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी दिली. हयगयीने वाहन चालवून स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कल्पेशविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.* मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रसिद्ध ठेकेदार शिवाजी गायकवाड यांचा तो मुलगा होता. कल्पेशच्या अचानक अपघाती मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक