ठाणे : घोडबंदर रोड येथे युरेनियमसह ताब्यात घेतलेल्या सैफुल्ला वजाहतुल्ला खान (३७) आणि किशोर विश्वनाथ प्रजापती (५९) या दोघांना ठाणे न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. अॅटोमिक एनर्जीसंदर्भातील तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सुनावणी ‘इन कॅमेरा’ घेण्यात आली.महिलांवरील लैंगिक अत्याचार तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी इन कॅमेरा होते. अॅटोमिक एनर्जीसंदर्भात दाखल झालेला ठाण्यातील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्याची प्रथमच ठाणे न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी झाली. (प्रतिनिधी)
युरेनियमप्रकरणी ‘इनकॅमेरा’ सुनावणी
By admin | Updated: December 26, 2016 04:17 IST