वासिंद : येथील मौजे पाली येथे स्वामी विवेकानंद संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माजी प्राचार्य भगवान जाधव यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव महाराज हरड, प्रकाश गोंधळी, वनाधिकारी मंगेश धिमते, साने-पालीच्या उपसरपंच काजल तरणे, सदस्य अनंता पाटील, पप्पू तरणे, पोलीस पाटील साईनाथ तरणे, संस्थाध्यक्ष सुनील म्हसकर, उपाध्यक्ष संजय तरणे, कोषाध्यक्ष शिवाजी तरणे, शैलेश तरणे, जोन तरणे आदी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना जाधव यांनी त्याग, सेवा, प्रेम आणि समर्पणाच्या भावनेने समाजकार्य व देशासाठी युवकांनी तत्पर असले पाहिजे, असा संदेश दिला. स्वामी विवेकानंद संस्था केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राशी संलग्न असून २५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. या कार्यालयासाठी म्हसकर यांनी स्वखर्चाने जागा उपलब्ध करून दिली आहे.