शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
5
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
6
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
7
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
8
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
9
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
10
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
11
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
12
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
13
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
14
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
15
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
16
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
17
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
19
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
20
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई! कसारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्याची अजूनही पंचाईत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:56 IST

असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.

कसारा, शाम धुमाळ |

येत्या १ मे महाराष्ट्र दिनी नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गचा अखेरचा टप्पा इगतपुरी ते भिवंडी हा ७५ किमी अंतराचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रगतीपथावर सुरु असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ देखील मिळाली असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. रस्ता खुला करण्याची घाई जरी महामंडळ करत असले तरी शहापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.

इगतपुरी ते भिवंडी या ७५ किलोमीटर कामाला सर्वात जास्त कालावधी लागला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गची घोषणा झाल्यापासून जमिनीच्या खरेदी - विक्रीला विरोध करत जनआंदोलन उभे केले होते. वाढत्या विरोधाला शांत करण्यासाठी त्यावेळेचे पालकमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात समृद्धी महामार्गाच्या जमिनीचे पैसे जमा होतं नाही तोपर्यंत सब रजिस्टर कार्यालयातच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत थांबवण्याचा फंडा वापरत तालुक्यातील जनतेला शासनाबाबत जागरूक करत जमिनी खरेदी - विक्रीला चालना दिली होती. मात्र तदनंतर जमिनी खरेदी - विक्रीचा सावळागोंधळ पाहवयास मिळाला व याचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील आदिवासी, कातकरी, दलित समाजातील शेतकऱ्यांना बसला तर काही व्यापाऱ्यांना देखील यांचा फटका बसला.

नावाला तालुका पेसा, मात्र आदिवासी मोबदल्यापासून अलिप्त 

शहापूर तालुका हा पेसामध्ये मोडत असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. त्यातच येथे येणारे अधिकारी, कर्मचारी हे देखील आदिवासी समाजाचे आहेत. असे असताना देखील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गत अनेक आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनी बाधित झालेल्या आहेत त्यातील अनेक कुटुंबाना अजूनही मोबदला मिळाला नाही, विशेष म्हणजे तालुक्यातील भूमिहीन आदिवासी कुटुंबाच्या कल्याणासाठी व आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी शासनाने त्यांना जमिनी दिलेल्या आहेत. त्यांचे वनहक्क दावे मंजूर होऊन वनपट्टे देखील जाहीर झालेले आहे. असे असताना देखील मागील सात वर्षांपासून या आदिवासी कुटुंबांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी शासनाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तालुक्यातील वाशाळा, फुगाळे, कसारा बु, शेलवली या गावातील बाधित ग्रामस्थांचे वनहक्क दावे मंजूर असून त्यातील काही शेतकऱ्यांकडे सनद देखील आहेत तरीसुद्धा हक्काच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. यांचसोबत अनेक व्यापारी व शेतकऱ्यांच्या वादातील प्रकरणांचा आर्थिक मोबदला भूसंपादन अधिकारी यांनी न्यायालयात जमा केल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. गुरुवारी सकाळपासून फुगाळे व वाशाळा गावातील समृद्धी बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी फुगाळा बोगदा येथे ठिय्या आंदोलन सूरु केले असून जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

शासनाकडून आमची घोर फसवणूक होत असल्याने आम्ही  गुरुवार पासून फुगाळे वाशाळा येथील सर्व शेतकरी कुटुंब वाशाळा बोगद्या जवळ या आंदोलनाला बसलो असून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही - एकनाथ भला, फुगाळे शेतकरी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार