शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:07 IST

बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

ठाणे : बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या चंदनवाडीमध्ये राहणारे मयूरेश शेळके (२५) यांचे भाऊ विनायक शेळके हे लष्करी अधिकारी आहेत. त्यांनीच मयूरेश यांना पैसे देण्यासाठी निलेश दातखिळे या अन्य एका नातेवाइकाच्या बँक खात्यावर आॅनलाइन बँकिंगद्वारे ३० एप्रिल २०१८ रोजी आयसीआयसीआय बँकेतून एक लाख रुपये पाठवले होते. ते पाठवताना विनायक यांच्याकडून चुकून खात्याचा एक क्रमांक चुकीचा भरला गेला. त्यामुळे हे पैसे साठेनगरामध्ये राहणारे गणेश बयनेत याच्या आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई सेंट्रल येथील शाखेतील खात्यावर जमा झाले. आपल्या खात्यात अनवधनाने जमा झालेल्या पैशांची कोणतीही खात्री न करता गणेशने २ मे रोजी लगेच एक लाखांपैकी ९१ हजार रुपये खात्यातून काढून घेतले. इकडे पैसे न मिळाल्यामुळे दातखिळे यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांना गणेशच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे समजले. वारंवार विनंती करुनही पैसे न मिळाल्याने मयूरेश यांनी याप्रकरणी अखेर नौपाडा पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने त्याला ठाण्यातून अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा