शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यातील शाळांना सुट्टी - आयुक्त सौरभ राव

By अजित मांडके | Updated: July 25, 2024 21:37 IST

नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच शुक्रवारी देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुकतांना संबंधितांना दिले.         तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात २० पेक्षा जास्त फोनची सुविधा २४x७ कार्यान्वित आहेत. तसेच आलेल्या प्रत्येक फोनच्या तक्रारीचे निवारण पूर्ण होईपर्यत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नौपाडा- कोपरी परिसरातील पेढ्या मारुती मंदिर, वंदना सिनेमा परिसर, सिडको बस डेपो, चिखलवाडी, बारा बंगला, मेंटल हॉस्प‍िटल परिसर या ठिकाणच्या सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्याची कार्यवाही करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच कोपरी नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात परिमंडळ उपायुक्तांनी भेटी देवून सी १ आणि सी २ या धोकादायक व अतिधोकादायक इमारती रिकामी करण्याची कार्यवाही करण्यात आली.

वागळे प्रभाग समिती परिसरातील पडवळनगर, किसननगर, भटवाडी जनता झोपडपट्टी, श्रीनगर या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. तसेच अतिवृष्टीमुळे मुंब्रा परिसरातील खडी मशीन रोड व भीमनगर येथील रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची परिस्थिती नियंत्रणात आणून सदर ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस