शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:23 IST

लोकसभेतील कटुता, संघर्ष विधानसभा निवडणुकीत दिसणे अपरिहार्य

- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार कपिल पाटील यांना भाजपने केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन ठाणे जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी पाटील यांचा पराभव करून भाजपचे मनसुबे उधळून लावले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांवर महायुतीचे प्राबल्य असून, एक मतदारसंघ समाजवादी पार्टीकडे आहे. सपा आता महाविकास आघाडीत सामील झाली आहे. त्यामुळे पाटील यांच्या पराभवानंतर महायुतीचे येथील प्राबल्य किती व कसे टिकून राहते आणि बाळ्यामामा महाविकास आघाडीला किती यश मिळवून देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पाटील विरुद्ध मुरबाडमधील आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षामुळे महायुतीमधील दुभंग येथे लोकसभेत दिसला होता. त्यामुळे लोकसभेतील कटुता, संघर्ष विधानसभा निवडणुकीत दिसणे अपरिहार्य आहे.

भिवंडी पूर्व : २००९ ते २०१९ या काळात या मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांचा समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी पराभव केला. सध्या या मतदारसंघावर समाजवादीचे वर्चस्व आहे. म्हात्रे हे उद्धवसेनेतून मतदारसंघावर दावा करत आहेत. मनसेचे मनोज गुळवी यांनी मोर्चेबांधणी केली असून भाजपतर्फे माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि सुमित पाटील लढण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. 

भिवंडी पश्चिम : भाजपचे वर्चस्व आहे. महेश चौघुले हे दोनवेळा विजयी झाले. काँग्रेसकडून माजी महापौर विलास पाटील, शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी नगरसेवक तलाह मोमीन समाजवादीकडून रियाज आझमी ही नावे चर्चेत आहेत. भिवंडी ग्रामीण : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून शिंदेसेनेचे शांताराम मोरे दोनवेळा निवडून आले. मात्र, यावेळी उद्धवसेनेचे कडवे आव्हान असणार असून महादेव घाटाळ यांनी मोर्चेबांधणी केली आहे.

कल्याण पश्चिम : या मतदारसंघावर शिंदेसेनेचे वर्चस्व असून, विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पवार, तसेच उद्धवसेना आणि मनसेने  उमेदवारांसाठी कंबर कसली आहे. 

शहापूर : मतदारसंघावर अजित पवार गटाचे वर्चस्व असून मतदारसंघात दौलत दरोडा आमदार आहेत. दरोडा यांना शरद पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे आव्हान असणार आहे.

मुरबाड : या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून किसन कथोरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदेसेनेचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मोर्चेबांधणी केली असून शरद पवार गटाने देखील मोर्चेबांधणी केली आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना