शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ठाणे जिल्ह्यात शिंदे गट 'अब तक छप्पन'; ठाकरे गट पिछाडीवर, पण 'कांटे की टक्कर' 

By सुरेश लोखंडे | Updated: October 17, 2022 19:53 IST

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चुरस झाली. 

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. शिवसेनेच्या दोन्ही गटांमुळे यात कमालीची भर पडली. यात बाळासाहेबांची शिवसेनेला (शिंदे गट) ५६ जागा तर शिवसेनेला (ठाकरे गट) ४४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. याशिवाय महाविकास आघाडीला २५ आणि भाजपाला १९ तर इतरांनी नऊ जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली असता त्यात १८ बिनविरोध विजयी झाल्या. तर बहिष्कार असल्यामुळे नवी मुंबईच्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या नाही. उर्वरित १३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार झाल्या असता त्याची मतमोजणी आज पार पडली. या ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यातील ४५९ मतदान केंद्रांवर ७९.५४ टक्के मतदान झाले असता त्याची आज मतमोजणी झाली. जिल्ह्याभरातील ११९ सरपंच पदासाठी व ८५५ सदस्यांसाठी एक लाख ९० हजार  ६४७ जणांनी मतदान करून आपला उमेदवार विजयी केला. यासाठी जिल्ह्यात तीन हजार १५५ उमेदवार होते.

मतदान होऊन विजयी झालेल्या व बिनविरोध निवड झालेल्या आदी १५३ ग्राम पंचायतींवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कमी अधीक दावा केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी ५६ ग्राम पंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला. यामध्ये त्यांनी शहापूरला २९ तर मुरबाडला १५ आणि भिवंडीला श्रमजीवीला सोबत घेऊन १३ जागांवर विजय मिळवल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रमाणेच  भिवंडी, शहापूरला शिवसेनेच्या ठाकरे गटाला ४४ लागा मिळवता आल्याचे दिसून येत आहे. तर मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथच्या एका ग्राम पंचायतीसह भाजपाला १९ जागा मिळाल्याचा आंदाज आहे. याविषयी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना विचारणा केली निकालाची आकडेवारी पूर्णपणे हाती आली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. महाविकास आघाडीला २५ ग्राम पंचायती मिळाल्या असून यामध्ये शहापूर आणि कल्याण येथील ग्राम पंचायतीचा समावेश आहे. भिवंडीत मनसेला दोन जागा मिळाल्याचे आढळून आले. उर्वरित नऊ ग्राम पंचायतींवर इतरांचे वर्चस्व असल्याचे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेgram panchayatग्राम पंचायत