शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात ठाण्यातून तेंडुलकर, गावसकर निर्माण होतील! अर्जुन रणतुंगा यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:12 IST

राम सेतू झाला तर आपण अर्ध्या तासात भारतातून श्रीलंकेला पोहोचू आणि तशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करूया

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लहान मुले ही उद्याचे भविष्य आहेत, मग ती भारतातील असोत वा श्रीलंकेतील. त्यांनी क्रीडा क्षेत्रात आल्यावर फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करावे. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य राखणे भारताच्या भविष्यासाठी चांगले आहे. भविष्यात कदाचित आपल्या भागातून सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर निर्माण होऊ शकतात. अनेक दिग्गज क्रिकेटपटू हे अशाच छोट्या छोट्या भागांतून आलेले असतात, असे प्रतिपादन श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी मंगळवारी ठाण्यात केले. 

स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ‘व्यायामशाळेचे उद्घाटन’ रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. रणतुंगा म्हणाले की, राजकारणी म्हणून आम्हाला जनतेसाठी काम करावे लागते जे मी गेली २० वर्षे करीत आहे. सरनाईकही तेच करीत आहेत. मी लहान असताना क्रिकेटसाठी पर्यायाने क्रीडा क्षेत्रामध्ये फारशा सुविधा नव्हत्या. परंतु हल्ली लहान मुलांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी स्विमिंग पूल आहे, व्यायामशाळा आहे. तसेच, त्यांना क्रिकेटचे साहित्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी क्रिकेट तसेच, इतर क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक मिळवावा. ठाण्यात येऊन आनंद झाल्याचे सांगत तरुण पिढीने क्रीडा क्षेत्रात यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

अनावश्यक गोष्टीमध्ये लहान मुले आपला वेळ खर्ची घालतात आणि आपल्या भविष्याचे नुकसान करतात. सरनाईक यांनी हाती घेतलेली संकल्पना कौतुकास्पद आहे. यातून भारतासाठी चांगले क्रिकेटपटू निर्माण होऊ शकतात. भारतीय क्रिकेट खेळाडू खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत, असेही ते म्हणाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे पूर्वेश सरनाईक यांनी प्रास्ताविक केले.

‘...तर अर्ध्या तासात श्रीलंकेत पाेहाेचू’सरनाईक म्हणाले, आता राम मंदिर होत आहे, राम सेतू झाला तर आपण अर्ध्या तासात भारतातून श्रीलंकेला पोहोचू आणि तशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करूया. दीड महिन्यात स्केटिंग ट्रॅक सुरू करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाला रणतुंगा यांचे निकटवर्तीय व्यंकट, विहंग सरनाईक उपस्थित होते. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका