शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात; गेटवर बसून, काळ्या फिती लावून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 16:51 IST

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे अकृषी विद्यापीठीय  व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, (विशाल हळदे)-  महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे अकृषी विद्यापीठीय  व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मागील ४ वर्षापासून सदर मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असल्याने शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करण्याच्या मार्गांवर आहेत.त्याचा एक भाग म्हणून जोशी - बेडेकर कॉलेज मधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कॉलेजच्या गेटवर बसून,काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला.

सुधारित सेवान्तर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणे, १०,२०,३० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांना लागू करणे, १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२० अखेरची प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या दरम्यानची फरकाची थकबाकी व १४१० विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरुन त्याआधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे या मुख्य सहा मागण्यांबाबत राज्यातील अकृषिक विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांनी १८  डिसेंबर २०२१ पासून ११ दिवस राज्यस्तरीय काम बंद आंदोलन केलेले होते तत्कालीन तंत्रशिक्षण मंत्री यांच्या आश्वासनानन्तर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु चर्चा आणि आश्वासन या व्यतिरिक्त  कर्मचा-यांच्या पदरी काही पडले नाही.

या प्रमुख मागण्यांसंदर्भात समितीने सरकार दरबारी पुन्हा आपला आवाज उठवला आहे. आपल्या आंदोलनाची दिशा , आपल्या मागण्या इत्यादी सविस्तरपणे निवेदनात मांडले आहे. सदर मागण्या मान्य  न झाल्यास  संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व  महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय  आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे  देण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणे