मीरा रोड - मीरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह पालिकेतील उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
मीरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आले होते. एकनाथ शिंदे व तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्याशी त्यांची तशी जुनी मैत्री मानली जाते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते काही काळ तटस्थ होते. भाईंदरच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेविका हेलन गोविंद यांचे माजी नगरसेवक पती जॉर्जी गोविंद यांच्यासह मच्छीमार नेते, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.