शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

By नितीन पंडित | Updated: January 8, 2023 18:01 IST

 भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 

भिवंडी: १९ वर्षीय तृतीयपंथ्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार  केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत शुक्रवारी घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील आजादनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तहाल सलीम खान वय २३,आणि शाहिद वय २५ वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत. 

१९ वर्षीय पीडित तृतीयपंथी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती. त्यातच ६ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी  घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव , आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. मात्र त्याला नकार दिला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे. तुझ्याशी काही बोलायचे आहे. असे बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीत घेऊन आला. त्यानंतर खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास अळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केले.

अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर पहाटे पीडितला खोली बाहेर काढले. आणि घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता केली तर ठार मारण्याची नराधमांनी धमकी दिली. त्यानंतर पीडित बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असाह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना व गुरुला सांगितला. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीसांनी दोघांना अटक केली असून या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी