शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

By नितीन पंडित | Updated: October 17, 2022 15:49 IST

तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे

भिवंडी : - भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने १४ ग्राम पंचायती जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे अवघी घोडगाव हि एकमेव ग्राम पंचायत आली असल्याने शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांना हि या निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले आहे.तर भाजपाने अवघ्या सात ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे.          तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले असून शिरोळे व दिघाशी या दोन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय संपादन केला. तर कवाड,गाणे, पारीवली,पाच्छापूर,वेढे,खरीवली, पिंपळघर याठिकाणी भाजपाने यश मिळविले आहे.तर काँग्रेस व राष्ट्रवादीला           कामतघर येथील वऱ्हाळमाता मंगल भवन येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवात करण्यात आली होती. दुपारी एक वाजता ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांनी यावेळी निरीक्षक म्हणून या मतमोजणी वर लक्ष ठेवले होते.           शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विजयी उमेदवार बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला .

एकुण ग्रामपंचायत- ३१

शिवसेना - १४शिंदे गट  - ०१भाजप    - ०७राष्ट्रवादी  - ००काँग्रेस    - ००मनसे      - ०२इतर       - ०७

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेgram panchayatग्राम पंचायत