शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वेठबिगार मजूर शासकीय दाखल्यांपासून वंचित; तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन

By नितीन पंडित | Updated: July 1, 2024 19:45 IST

आंदोलनकर्त्या महिलेने हाती राजदंड घेऊन होत असलेल्या अन्यायाविरोधात व्यक्त केला निषेध

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: वीटभट्टी वर तुटपुंज्या मजुरीवर वर्षोंनवर्षे राबवून घेतल्या जाणाऱ्या आदिवासी वेठबिगार यांच्या मुक्ती नंतर त्यांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने चाळीस वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर या महिलेने भिवंडी तहसीलदार कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून या घटनेचा निषेध केला असून जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नातून सुनील भोये वय १८ वर्ष या वेठबिगार मजुरास भिवंडी तालुक्यातून मुक्त करण्यात आले होते.त्यास सहा महिने उलटून गेले तरी सुध्दा सुनील भोये यास आधारकार्ड बनवून देण्यात आला नाही.ज्यामुळे त्याचे बँक खाते उघडण्यास अडचण येत असल्याने वेठबिगार मुक्ती पुनर्वसन निधीचा लाभ मिळण्यात पासून तो वंचित राहिला आहे.

वेठबिगार मुक्ती नंतर हाताला काम नसल्याने व शासकीय दाखले मिळत नसल्याने सुनील भोये यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सुनील भोये यास न्याय मिळवून देण्यासाठी ४० वर्षां पूर्वी वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालय गाठत तहसीलदार अभिजित खोले हे कार्यालयात नसल्याने कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून आंदोलन केले.सुनील भोये यास न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भावना ताईबाई गायकर यांनी बोलून दाखवली आहे.

वेठबिगार मुक्ती नंतर संबंधित मुक्त झालेल्या मजुरास तात्काळ बंध मुक्तीचा दाखल दिला जातो. सुनील भोये यांना जॉब कार्ड सुध्दा बनवून देण्यात आले आहे.परंतु वास्तव्याचा पुरावा नसल्याने आधारा कार्ड बनविण्यात अडचण येत आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया निवासी तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी