शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

ठामपा स्थायी समितीने फेटाळली पाणीदरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:45 IST

पालिकेने सादर केलेल्या २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजखर्चास स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली.

ठाणे : ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठ्याच्या घरगुती, व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनात ५० ते ६० टक्के दरवाढ प्रस्तावित केली होती; परंतु स्थायी समितीने ती फेटाळली. प्रशासनाने सादर केलेल्या ३,७८० कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात ३०६ कोटींची वाढ सुचवून ३,०८६ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर केले. आता ते अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे जाणार आहे.पालिकेने सादर केलेल्या २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजखर्चास स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. महासभेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या २०१९-२० चे ३,११० कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकासही स्थायी समितीने मंजुरी दिली. यात ४९.३० लाखांच्या शिलकेसह १,८४२.११ कोटींचा महसुली खर्च व १,९३७.४० कोटींचा भांडवली खर्च, असे एकूण ३,७८० कोटी रकमेच्या खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीस प्रशासनाने सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३०६ कोटींची वाढ करून ४,०८६ कोटींचे अंदाजपत्रक महासभेच्या मंजुरीसाठी पाठविले आहे. यामध्ये मालमत्ताकर, शहर विकास, जाहिरात, स्थावर मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कराच्या थकबाकीपोटी वसुली अपेक्षित करून जमेत वाढ केली आहे. मात्र, प्रशासनाने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीची दरवाढ अमान्य केली आहे.रविवारी मालमत्ताकर संकलन केंद्र राहणार बंद२२ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदी (जनता कर्फ्यू) जाहीर झाल्याने ठाणे महानगरपालिकेची सर्व करसंकलन केंद्रे बंद असणार आहेत. मात्र, आॅनलाइन करसंकलन स्वीकारले जाणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी तसेच ठामपा क्षेत्रातील मालमत्ताधारक नागरिकांना कर मुदतीत भरता यावा, याकरिता ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये, उपप्रभाग समिती स्तरावरील सर्व करसंकलन केंद्रे व त्याला संलग्न कार्यालये १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीदेखील सुरू राहणार होती. परंतु, जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्या दिवशी ही कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणीthaneठाणे