शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

येऊरच्या बेकायदा टर्फ क्लबना पालिकेने ठोकले अचानक सील

By अजित मांडके | Updated: October 10, 2023 19:09 IST

न्यायालयीन सुनावणीच्या एक दिवस आधी कारवाईचा बडगा

ठाणे :ठाणे महापालिकेला आज येऊरमधील टर्फ क्लबसकट इतर अनधिकृत बांधकामांबाबत सद्यस्थिती अहवाल न्यायालयात सादर करायचा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच मंगळवारी पालिकेने तोंडघशी पडण्याच्या भीतीने येऊरमधील ९ पैकी ५ टर्फ आणि क्लबला अखेर सील ठोकले असल्याची माहिती समोर आली आहे.

येऊरच्या जंगलात बेकायदा बांधकामे, हॉटेल्स, ढाबे , लग्नाचे हॉल, येथे होणार्‍या पार्ट्या आणि डिजेच्या गोंगाटामुळे वन्यजीवन व स्थानिक आदिवासी समाज अगोदरच संकटात आहे. त्यात गेल्या काही वर्षात कोणत्याही परवानगीशिवाय उभारलेल्या अनधिकृत टर्फ क्लबची भर पडली. शहरातील उरल्यासुरल्या खेळण्याच्या मोकळ्या जागा विविध विकास कामांमध्ये नष्ट होऊन तिथे क्रिकेट, फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळण्याची सोय म्हणून येऊरच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात बेकायदा टर्फ कलबची उभारणी झाली. टर्फ च्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्थांना घरगुती तसेच सार्वजनिक कार्यक्रम साजरे करायला आयतेच येऊरचे जंगल आंदण मिळाले.

तीव्र प्रकाशझोतात व डिजेच्या दणदणातात रात्रंदिवस धुडगूस घातला जात होता. अनेकवेळा स्थानिकांनी जागरूक सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणीय संस्थांच्या मदतीने सरकार दरबारी यावर आवाज उठवला. विधी मंडळातसुद्धा यावर चर्चा झाली विविध न्यायालये, प्राधिकरणाने या अनधिकृत बांधकामांविषयी ठामपाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तोडक कारवाईचे आदेश दिले. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी  ठाणे महानगरपालिका विरोधात जनहित याचिका दाखल केली. याची पुढील सुनावणी ११ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे पालिका अचानक खडबडून जागी झाली असून त्यांनी टर्फ, क्लबवर कारवाई करत सील ठोकले आहे.

या पूर्वी  झालेल्या सुनावणी दरम्यान ठाणे महानगरपालिका तसेच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समिती वन विभाग तसेच वीज मंडळाला प्रतिज्ञापत्रावर येऊरमधील टर्फ कलबसकट इतर अनधिकृत बांधकामांबाबत ३० दिवसात सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत टळून १५ दिवस झाले तरी यापैकी एकानेही ते सादर केले नसल्याचे याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले. कारवाई करायची तर हा आपला तो दुसर्‍याचा असा दुटप्पीपणा न करता व कोणत्याही दबावाला न झुकता सरसकट सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ निष्कासित करावीत.- रोहित जोशी - जनहित याचिकाकर्ते

न्यायालयाने सांगितल्यानुसार आम्ही ही कारवाई केली आहे. जो पर्यंत न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत ते बंद ठेवण्यात येणार आहेत, मात्र सील करण्याची कारवाई केलेली नाही  आहेत.-गजनान गोदेपुरे - उपायुक्त, ठामपा

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका