शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक: ८२ बसेसवर परवाना निलंबनाची ठाणे आरटीओची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: June 25, 2020 00:08 IST

सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन न करता परस्पर प्रवाशांची वाहतूक करणा-या ८२ बसेसवर ठाणे प्रादेशिक परिहवन विभागाच्या १२ पथकांनी गेल्या चार दिवसांमध्ये कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसेसच्या जप्तीसह त्यांचा परवानाही एक महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे गुजरातमार्गे जाणाऱ्या ३० बसेसही जप्तसामाजिक अंतराचे नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयाच्या सीमेवरुन परराज्यात विनापरवाना तसेच सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन न करता परस्पर प्रवाशांची वाहतूक करणा-या ८२ बसेसवर ठाणे प्रादेशिक परिहवन विभागाच्या १२ पथकांनी कारवाई केली आहे. यामध्ये बसेसच्या जप्तीसह त्यांचा परवानाही एक महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे प्रादेशिक परिहवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या आदेशाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शनिल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पथकांमधील २४ निरीक्षकांनी पडघा टोल नाका, गुजरात सीमेवरील दापचरी, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल आणि नवी मुंबईतील वाशी आदी ठिकाणी २० ते २३ जून दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात २० जून रोजी ३५ बसेस, २१ जून रोजी १८, २२ जून- १८ आणि २३ जून रोजी ११ बसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात पडघा येथे १६, दापचेरी येथे १२, फाऊंटन हॉटेल येथे १८ तर वाशी येथे ३६ बसेस ई पास न घेताच विनापरवाना जात प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळले. यामध्ये सामाजिक अंतराचे नियम न पाळणे, अधिकृत कागदपत्रे न बाळगणे असे अनेक नियम धाब्यावर बसविल्याचे आढळले. त्यांच्याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.

 

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस