शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

बेकायदा रिक्षाचालकांचा भिवंडीत उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:13 IST

दुप्पट भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा रिकामा : सामान्यांची लूट

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : अनलाॅकमध्ये रिक्षांना काही बंधने घालून परवानगी देण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांनी बंधने धुडकावून बेशिस्त वर्तनाचेच दर्शन घडवले आहे. काेराेना काळातील कसर भरून काढण्याचा चंग बांधून या रिक्षाचालकांनी सर्वसामान्य जनतेची लूट चालवली आहे. शहर आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. ग्रामीण भागात तर कहरच केला आहे. चार-पाच किमीच्या प्रवासासाठी प्रति माणसी १० वरून २० रुपये भाडेवाढ केली आहे. काही वेळा तर स्पेशल भाड्याच्या नावाखाली ८० ते १०० रुपये उकळले जात आहेत. 

कोरोनामुळे रिक्षात कमी प्रवासी बसविण्यात यावे असे निर्देश आहेत. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा हलतच नाही. भिवंडीत जवळपास सर्वच रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीची बाब पुढे करून भिवंडीत रिक्षाचालकांकडून स्वयंघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील अंजुरफाटा ते वडघर डुंगे खारबाव हा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आहे. यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. शहरात अंजुरफाटा ते वंजारपट्टी नाका या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरासाठी तीस रुपये माणसी मोजावे लागतात. 

काही दिवसांपूर्वी अंजुरफाटा येथून पायी जाताना एका रिक्षाचालकाने बेदरकारपणे धडक दिली. हा रिक्षाचालक मदत करण्याऐवजी मुजोरीने वागला आणि जखमी अवस्थेत मला साेडून पळून गेला.  रुग्णालयात उपचार घेताना पोलीस जबाबासाठी आले. पण त्यांनीही कारवाई केली नाही.- कविता जाधव-उबाळे, पूर्णागाव 

रिक्षा स्टॅंण्डवर २० ते २५ रिक्षा थांबण्याची परवानगी असते. शहरात २० ते २५ स्टॅण्ड आहेत. त्यामुळे हजारांच्या आतच अधिकृत रिक्षा असतील. मात्र शहरात पाच हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्या कोठेही उभ्या केल्या जात असल्याने कोंडीही वाढली आहे. - कल्याणजी घेटे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नारपोली अंजुरफाटा शाखा