शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू

By धीरज परब | Updated: May 8, 2023 20:04 IST

सदर बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता.

मीरारोड - मीरागाव नाक्यावर असलेल्या मानसी ह्या बेकायदा ऑर्केस्ट्रा बारचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या मागणीवरून पालिकेने जमीनदोस्त केले असताना आता त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले जात असल्याची तक्रार तेथील मीरा हाऊसिंग सोसायटीने पालिका व पोलिसांना केली आहे.

सदर मानसी बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता. सदर बेकायदा बारचे बांधकाम तोडण्याचे निर्देश जुलै २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी देऊन सुद्धा कारवाई झाली नव्हती. 

ऑर्केस्ट्राच्या आड सादर बारमध्ये अश्लील नाच चालत असल्याच्या तक्रारी नंतर कोरोना काळात पोलिसांनी टाकली होती. त्यावेळी बारच्या आत बेकायदा गोपनीय खोली सापडली. त्यावेळी ६ बारबाला व १ तृतीयपंथी ची सुटका करून बारच चालक - मालक व कर्मचारी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्या घटनेनं नंतर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानंतर मे २०२१ मध्ये पोलीस बंदोबस्तात पालिकेमार्फत सदर बार जमीनदोस्त केला होता. बार तोडल्या नंतर मोकळ्या झालेल्या काही जागेत पालिकेने रस्ता रुंद करून गटारचे बांधकाम केले.    

पालिकेने बारचा परवाना रद्द केला शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली. मात्र दोन वर्षां पूर्वी तोडण्यात आलेला मानसी ऑर्केस्ट्रा बारच्या जागी पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरु झाल्याची तक्रार येथील रहिवाश्यांच्या गृहनिर्माण संस्थेने पालिका आयुक्त दिलीप ढोले, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम आदींना लेखी स्वरूपात केली आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर