शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये सरकारी जागेत उभारलेले बेकायदा हॉटेल व लॉजिंग जमीनदोस्त   

By धीरज परब | Updated: July 12, 2024 18:58 IST

Mira Bhayander News: भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत उभारलेले बेकायदा आलिशान हॉटेल , लॉजिंगसाठी खोल्या आदी बांधकामे शुक्रवारी महसूल विभागाने पालिका आणि पोलिसांच्या साहाय्याने जमीनदोस्त केली .

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत उभारलेले बेकायदा आलिशान हॉटेल , लॉजिंगसाठी खोल्या आदी बांधकामे शुक्रवारी महसूल विभागाने पालिका आणि पोलिसांच्या साहाय्याने जमीनदोस्त केली . तब्बल ३० ते ३५ गुंठे सरकारी जागेत अतिक्रमण केले गेले होते आणि त्याला वीज पुरवठा देखील दिला गेला होता . 

भाईंदरच्या उत्तन भागातील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या सरकारी सर्वे क्र २०१ मधील जागेत भूमाफियांनी अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम चालवले होते . श्रमजीवी संघटनेचे सुलतान पटेल व वसीम पटेल यांनी तसेच अजय धोका ह्या नागरिकाने सरकारी जागेतील सदर बेकायदा आलिशान बांधकामावर कारवाईची मागणी चालवली होती.  

उत्तनच्या तलाठी अनिता पाडवी यांनी देखील सरकारी जमीतील बेकायदा बांधकाम व त्यावर वर कारवाई बाबत  वरिष्ठांना कळवले होते . दरम्यान लोकसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचार संहिते दरम्यान भूमाफियांनी सदर सरकारी जागेवर आलिशान बंगला सृदश हॉटेल , सुमारे १० ते १२ खोल्या आदी बांधकाम केले होते . सरकारी जागेतील बेकायदा बांधकाम असताना देखील त्याला वीज कंपनीने वीज पुरवठा केला होता . आलिशान हॉटेल व लॉजिंग खोल्यांना वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती .  

शुक्रवारी अपर तहसीलदार निलेश गौड, मंडळ अधिकारी दीपक अहिरे , तलाठी अनिता पाडवी यांच्यासह  पालिका उपायुक्त रवी पवार , प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह उत्तन सागरी पोलीस आदींनी दोन जेसीबीच्या सहाय्याने सरकारी जागेतील सदर बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली . सरकारी जागा बळकावून त्यात आलिशान बेकायदा बांधकामे करणाऱ्यात संतोष साठे उर्फ संतोष पाटील सह अन्य काही नावे सांगितली जात आहेत . 

सदर जागा सातबारा नोंदी सरकारी असून इतर हक्कात प्रेस क्लब व पिकनिक स्पॉट साठी आरक्षित असल्याचे नमूद आहे  अशी माहिती अपर तहसीलदार गौड यांनी  दिली . शहरातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस कारवाई सह गुन्हे दाखल केले जाणार असून या संदर्भात महापालिका आणि वीज कंपन्यांना देखील पत्र देणार असल्याचे गौड यांनी सांगितले . सरकारी जागेत अतिक्रमण करून अनेक लॉजिंग , बार , आलिशान बंगले , वाणिज्य वापर आदीची बेकायदा बांधकामे  झाली असून ती तोडून गुन्हे दाखल करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर