शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बसस्थानकाच्या राखीव भूखंडावर बेकायदा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:41 IST

खाजगी वाहनांचेही अतिक्रमण; एसटी महामंडळ, महापालिकेची डोळेझाक

भाईंदर: एसटी, एमबीएमटी, बेस्टच्या प्रवाशांना भरउन्हापावसात बससाठी रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्याचवेळी भार्इंदर पश्चिमेला असलेल्या एसटी डेपो व बसस्थानकासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बेकायदा भराव आणि खाजगी गाड्यांचे अतिक्रमण सुरूच आहे. महापालिकेचा रखवालदार आणि एसटीने लावलेला फलक कूचकामी ठरले आहेत. त्यामुळे हा प्रकार एसटी व पालिकेच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.भार्इंदर पश्चिमेस रेल्वेस्थानकाबाहेरून एसटी, एमबीएमटी व बेस्टच्या बस येजा करतात. येथील एसटीच्या जुन्या चौकीची दुरवस्था झाली असून प्रवाशांना थांबण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. येथील बसथांब्यांवरही बेकायदा रिक्षांचे अतिक्रमण असते. बस उभ्या करणे, वळवणे आदीसाठी मोठ्या बसडेपो आणि सुविधांची प्रवाशांना गरज आहे.रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावरच एसटी डेपोसाठी भूखंड राखीव ठेवलेला आहे. पण हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असून निम्म्यापेक्षा जास्त जागेत कांदळवन आहे. या जागेला कुंपणभिंत घातलेली आहे. तर कांदळवन सोडून अन्य जागेत बेकायदा भराव सुरू आहे. मासळीचे घाऊक विक्रेतेही त्यांचे थर्माकोल आदी कचरा याच कांदळवनात टाकत आहेत. भराव झालेल्या जागेत एसटी, एमबीएमटी स्थानक सुरू केले जात नसले, तरी खाजगी बस, टेम्पो, रिक्षा आदी वाहनांनी अतिक्रमण करून तळ ठोकला आहे. येथे सर्रास गॅस सिलिंडर ट्रकमध्ये भरले जातात. खाजगी लोक आणि व्यावसायिकांना तर वाहने उभी करण्याची फुकटची सोय झालेली आहे. खाजगी वाहनांच्या अतिक्रमणावरून एसटी आणि पालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर या भूखंडाच्या प्रवेशद्वारावर एसटीने दोन फलक लावले आहेत. ही जागा राज्य परिवहन महामंडळाची असून खाजगी वाहने उभी केल्यास पोलीस कारवाईचा इशारा दिलेला आहे. तर महापालिकेने त्यांच्या ठेक्यातील सुरक्षारक्षक तैनात केला आहे. मात्र, तो बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. ठेकेदारामार्फत ठेवलेला रखवालदार खाजगी वाहनांची बेकायदा पार्किंग रोखत नसेल तर सामान्य विभागास कारवाई करण्यास सांगू, असे महापालिका शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी सांगितले.सुरक्षारक्षक असताना गाड्या उभ्या कशा राहतात?हप्ते घेऊन याठिकाणी खाजगी वाहने उभी करू दिली जात असल्याचे आपण सतत सांगत आहोत. पालिकेने सुरक्षारक्षक ठेवूनही खाजगी गाड्या कशा उभ्या राहतात, असा सवाल स्थानिक नगरसेविका रिटा शाह यांनी केला आहे. महापालिका आणि एसटीचे अधिकारी-कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.याठिकाणी असलेले लोखंडी प्रवेशद्वार दुरुस्त करून रखवालदारामार्फत केवळ एसटी, पालिका बससाठी खुले केल्यास येथील बेकायदा पार्किंगसह चालणारे अन्य गैरप्रकार रोखता येतील. याठिकाणी त्वरित बसस्थानक सुरू करावे, असे शाह म्हणाल्या.