शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आरक्षित जागेवर बांधल्या बेकायदा चाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:41 PM

कारवाईची मागणी : वसार येथील महिलेने केली केडीएमसीकडे तक्रार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात खेळाचे मैदान व पोलीस ठाण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूमाफियांनी चाळी उभारल्या आहेत. या चाळी तोडण्याची मागणी अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील रहिवासी कुंदा मढवी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे महापालिका बेकायदा चाळी उभारणाऱ्यांविरोधात काय कारवाई करते, याकडे मढवी यांचे लक्ष लागले आहे.

मढवी यांनी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित जागेविषयी विचारणा केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने मढवी यांना लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘२७ गावे महापालिका हद्दीत २०१५ पासून समाविष्ट करण्यात आली आहेत. २७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकास योजना तयार करून त्यास सरकारची मंजुरी घेतली आहे. वसार गावातील आरक्षित जागेवर ज्या भूमाफियांनी चाळीचे बांधकाम केले आहे, ती जागा विकास योजनेच्या आराखड्यात खेळाचे मैदान व पोलीस ठाण्यासाठी आरक्षित आहे. आरक्षित जागेचे रक्षण करणे व त्यावर होत असलेल्या बेकायदा चाळी तोडण्याचे काम महापालिकेचे आहे.’ मात्र, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने मढवी यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून दाद मागितली आहे. मढवी यांच्या तक्रारीला अनुसरूनच जितीन साळुंके यांनीही विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.दरम्यान, हा परिसर महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र ९ आयच्या अंतर्गत येतो. या प्रभागाचे प्रभाग अधिकारी एस.आर. रोकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात मढवी यांचा तक्रार अर्ज प्रभाग कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्याची शहानिशा करून संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका