शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष : ठाण्यातील १३ हॉटेल्स पालिकेने केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:08 IST

आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणा-या ८६ पैकी १३ हॉटेल सील करण्याची कारवाई ठाण्याच्या अग्निशमन दलाने रविवारी ठाणे शहरात केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

ठळक मुद्देआयुक्तांनी दिले होते शनिवारी आदेशअग्निशमन दलाची २४ तासातच कारवाईआणखी ७३ हॉटेल्स रडारवर

ठाणे: गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार नोटीसा देऊनही आपल्या हाटेलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना न करणा-या ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणा-या अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.आग प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अग्निशमन दलाने ठाणे शहरातील ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना ‘ना हरकत दाखला’ दिलेला नाही. त्यामुळ त्यांना सप्टेंबर २०१७ पासून फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ठाणे अग्निशमन दलाच्या वतीने त्यांची पूर्तता करण्यासाठी वारंवार नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० हॉटेल मालकांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करुन हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला. जी हॉटेल अधिकृत इमारतीमध्ये नाहीत परंतू, त्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांची पूर्तता केली आहे, अशी २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये असूनही ज्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशा ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांमध्ये सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या आदेशानंतर २४ तासांच्या आतच मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या पथकाने रविवारी हॉटेल टायटॅनिक(कळवा), हॉटेल एव्हरी डे अंडे (नौपाडा), हॉटेल म्युनो (कोठारी कंपाऊंड), हॉटेल ७० डिग्री (कोठारी कंपाऊंड), हॉटेल रेनबो बार (बाळकुम नाका), हॉटेल एक्स झोन (वाघबीळ), हॉटेल गोल्डन फास्ट फूड (कोपरी), हॉटेल लजीज फूड जंक्शन (कोपरी), हॉटेल हादिया, हॉटेल कौसर (कौसा-मुंब्रा), हॉटेल देवीदर्शन(रघुनाथनगर), हॉटेल फुकरे( फ्लॉवर व्हॅली) आदी १३ हॉटेल्स सील केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठी आता धावपळ केली जात आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराच्या वसूलीचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण न करणाºया सहायक आयुक्त तथा संबंधित परिमंडळातील उपायुक्तांवर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त जयस्वाल यांनी शनिवारच्या बैठकीत दिला होता. याच पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानेही ८६ हॉटेल्सवरील कारवाईचे गांभीर्य ओळखून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेfireआगhotelहॉटेल