शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीचे लक्ष्य हुकल्याने 70 टक्केच मिळणार पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:16 IST

उल्हासनगर पालिका : आयुक्तांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

- सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची वसुली केली असा ठपका ठेवत आयुक्तांनी वसुलीच्याप्रमाणात ७० टक्के पगार काढण्याचे आदेश विभागप्रमुख उपायुक्त मदन सोंडे यांना दिले आहेत. याप्रकाराने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाल्याने पगार नको अशी भूमिका घेतली आहे.कोरोना काळात मालमत्ता कर बिले सहा महिने उशिराने गेल्याने ऑक्टोबर महिन्यानंतर खऱ्या अर्थाने विभागाची वसुली सुरू झाली. दरम्यान  विभागाच्या कर निर्धारक संकलकपदी जेठानंद करमचंदानी यांची नियुक्ती केली. तर विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार  सोंडे यांच्याकडे देण्यात आला. विभागाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी कोरोना काळ असल्याने नागरिकांना सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत ७१ कोटींची वसुली केली. गेल्यावर्षी विभागाची ७७ कोटींची वसुली झाली होती. कोरोना काळातही गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याबद्दल विभागाचे कौतुक होत आहे. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मात्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण केले नाही असा ठपका ठेवला. सुट्टीवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी सोंडे यांना मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुलीच्या प्रमाणात ७० टक्के काढण्याचे तोंडी आदेश दिले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशनव्हे सोंडे यांनी करमचंदानी यांना विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ७० टक्के प्रमाणात वेतन बिल लेखा विभागाला पाठविण्यास सांगितले. याप्रकाराने विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. कोरोना काळात घरोघरी जाऊन कोणतीही सक्ती न कारण अवघ्या काही महिन्यात ७१ कोटींची वसुली करूनही ७० टक्के पगार देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला पगार नको, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत पगाराचे बिल पाठवू नका, अशी विनंती केल्याची माहिती करमचंदानी यांनी दिली.दरम्यान, याआधीही ज्या कर्मचाऱ्यांनी वसुली कमी केली होती त्यांचे पगार रोखण्याचे आदेश संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. दरवेळेस आम्हालाच का जबाबदार धरले जाते असा सवाल विचारला जात आहेत. अन्य विभागाकडून अपेक्षित वसुली केली जात नसताना त्यांना जबाबदार धरले जात नाहीत, केवळ आम्हीच दिसतो का असेही कर्मचारी विचारत आहेत. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला असून आम्ही जीव धोक्यात घालून वसुली करुनही आमच्यावर अन्याय होणार असेल कर आम्ही काम तरी का करायचे, प्रशासनाने आपली ही भूमिका तातडीने बदलण्याची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.कर्मचारी संघटना आक्रमकमहापालिका मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी आयुतांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. सोमवारी आयुक्त सुट्टीवरून परत आल्यावर  त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतरही त्यांनी भूमिका बदलली नाहीतर, संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.