शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 16:26 IST

सोमवारी झालेल्या एका तासाच्या पावसामुळे नाल्याच्या सफाईच्या कामांचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने बुधवारी एक दिवसाचे उपोषण केले.

ठळक मुद्देन्यायालयात जाण्याचा दिला इशारादोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

ठाणे : पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली असून त्याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बुधवारी ठाणे शहर कॉंग्रेसच्या वतीने वर्तक नगर प्रभाग समिती समोर एक दिवसाचे उपोषण केले. त्याला राष्ट्रवादीने सुध्दा पाठींबा दिला. शिवाय यापुढे जर पुन्हा शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली तर नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयसमोर टाकला जाईल असा इशाराही यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे.                    सोमवारी झालेल्या तासाभराच्या पावसातच ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. पालकमंत्र्यांच्या घरात आणि आयुक्तांच्या बंगल्यासमोरही पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. तर शहरातील वर्तक नगर, नौपाड्यातील चिखलवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे टुकार झालेल्या नालेसफाईच्या विरोधात बुधवारी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी एक दिवसाचे लाक्षणकि उपोषण केले. या उपोषणाला आनंद परांजपे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, नितीन पाटील, काँग्रेसचे सचिन शिंदे, राजेश जाधव, प्रदीप राव आदी उपस्थित होते. यावेळी ठामपा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.                             यावेळी विक्रांत चव्हाण नालेसफाई योग्य पध्दतीने झालेली नाही, नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला. खुद्द  पालकमंत्र्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते काढण्यासाठीच हे उपोषण केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या नाले सफाईच्या कामांच्या निविदासुध्दा उशिराने काढण्यात आल्याने केवळ पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका ठाणेकरांना बसला असून या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून नालेसफाईच्या कामांची चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष परांजपे म्हणाले की, साधारणपणे ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची गरज असतानाही नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच सोमवारी रात्री अवघा एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. वर्तकनगर, नौपाडा आणि मुंब्रा प्रभाग समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. गेल्या वर्षी अतिवृष्टीदरम्यान संभाजी नगर भागातून एक महिला नाल्यातून वाहून गेली होती. तरीही, प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नव्हते. अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी हितसंबध असल्याने ते ठेकेदारांवर मेहरनजर करीत आहेत. त्यातूनच नालेसफाई पूर्णपणे न झाल्यानंतरही त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही परांजपे यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस