शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन करावाच लागेल", ठाण्याच्या महापौरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:24 IST

Coronavirus : मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. परंतु ठाणोकर नागरीक शासनाने किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे.

ठाणे  - मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. परंतु ठाणोकर नागरीक शासनाने किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसेल असे वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. (If people don't follow the rules, they will have to lockdown, Thane Mayor Naresh Mhaske)सोमवारी महापौर म्हस्के यांच्या दालनात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर कशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात येत आहेत. कशा प्रकारची तयारी केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. यावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कशा पध्दतीने सज्ज आहे, याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.परंतु फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतांना दिसत आहेत. ठाण्यात आजच्या घडीला रोजच्या रोज 2क्क् ते 3क्क् रुग्ण आढळत आहेत. परंतु त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोवीड सेंटर सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. अॅम्ब्युलेन्स, औषधांचा साठा, क्वॉरन्टाइन सेंटर देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. परंतु असे असले तरी आजही ठाण्याच्या बाजारपेठा असतील किंवा बसेस असतील किंवा इतर ठिकाणी देखील नागरीकांची गर्दी होतांना दिसत आहे. मास्कचा वापर कमी होतांना दिसत आहे. इतर शहरात देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायचा नसेल तर नागरीकांनी जबाबदारीने वागणो गरजेचे असल्याचे मत महापौर म्हस्के यांनी व्यक्त केली. त्यांनी मास्कचा वापर केला, गर्दीत जाणो टाळले, शासनाने किंवा महापालिकेने घालून दिलेले नियम पाळले तर लॉकडाऊन घ्यावा लागणार नाही. परंतु नागरीकांनी नियम पाळले नाही आणि कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिले तर लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या