शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

डॉक्टर नाही, तर आम्हाला किमान भगत द्या!, श्रमजीवीने केले ‘रवाळ’ आंदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 10:53 IST

गरीबांना उपचारांचा आधार असलेल्या मोफत उपचार देण्याचे बंधन असलेली शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत.

ठाणे  : ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. आरोग्य संस्था मरणपंथाला लागल्या आहेत. त्याविराेधात श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ग्रामीण भागात डॉक्टरांअभावी आराेग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याने श्रमजीवी संघटनेने पारंपरिक नवीन भगत तयार करण्याचा रवाळ कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी २० भगतांचा पदवीदान कार्यक्रम करून त्यांना आरोग्य सेवेत शासनाने नियुक्त करावे, अशी मागणी करून ग्रामीण भागातील आराेग्य सेवेच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. 

गरीबांना उपचारांचा आधार असलेल्या मोफत उपचार देण्याचे बंधन असलेली शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. याबाबत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मे रोजी ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांना अचानक भेट देऊन पंचनामा केला हाेता. त्यात आराेग्यसेवेचे विदारक चित्र उघड झाले हाेते. यात तिन्ही जिल्ह्यांतील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक आणि कर्मचाऱ्यांच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदे भरलेली आहेत, तर ४५५ पदे रिक्त आहेत. ३९ टक्के पदे रिक्त असून, ६१ टक्के  मनुष्यबळावरच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरू असल्याचे उघड झाले हाेते.

या पार्श्वभूमीवर साेमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले. यात मृतवत झालेल्या या आरोग्यव्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिकांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे, अशी उपरोधिक मागणी करून भगतांचा पदवीदान सोहळा म्हणजेच पारंपरिक  रवाळ  कार्यक्रमातून शासनाचे लक्ष वेधले.  यावेळी आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय; डॉक्टर नको, भगत द्या, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

तिन्ही जिल्ह्यांतील आराेग्य केंद्रांतील मनुष्यबळ पद    मंजूर    भरलेली    रिक्तआराेग्य सहायक    ५३    ३२    २१आराेग्य सहायिका    ६५    ५२    १३ आरोग्य सेवक    २४१    १५४    ८७आरोग्य सेविका    २९५    २१०    ८३ जीएनएम    ४२    ३९    ३औषध निर्माता    ४९    ३८    ११प्रयोगशाळा तंत्रज्ञ    ५९    ४६    १३

टॅग्स :thaneठाणे