शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला महाआघाडीत घेतल्यास काँग्रेसची पोलखोल करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 00:47 IST

अबू आझमींचा इशारा : महाआघाडीकडून अद्याप निमंत्रण नाही

भिवंडी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास उत्तर भारतातील सर्व राज्यांच्या प्रचारांत समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसची पोलखोल करण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आसीम आझमी यांनी शुक्रवारी दिला. महाआघाडीकडून अद्याप आपल्याला निमंत्रण आले नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची घोषणा आझमी यांनी यावेळी केली.

शहरातील एका सभागृहात समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला अद्याप समाविष्ट करून घेतलेले नाही. समाजवादी पक्षाने भिवंडी, मुंबई अथवा नांदेड या तीनपैकी एक जागा मागितली आहे. त्यापैकी भिवंडी लोकसभा हे आमचे पहिले लक्ष्य आहे. आपल्या मागणीचा विचार न झाल्याने समाजवादी पक्ष सहा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आमच्यावर मतविभाजनाचा आरोप कुणी करू नये. काँग्रेसची सत्ता आली, तरी ‘कंट्रोल’ समाजवादीचाच असेल, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना लगावला.

लष्करामध्ये तीन टक्के मुस्लिम समाजाची भरती केली जाते; पण काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहा टक्के मुस्लिम मारले गेले. त्यामध्ये काश्मीरच्या मुस्लिम जवानांचा समावेश होता, असे सांगताना अबू आझमी म्हणाले की, काश्मीर आपल्या देशाचा भाग आहे, असे पंतप्रधान समजतात, तर काश्मीरमधील लोकांनादेखील आपले समजायला पाहिजे. प्रत्येक काश्मिरीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आजमी यांनी यावेळी केली.जवान शहीद होत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेण्याऐवजी, पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे, असे मत आजमी म्हणाले. मी मराठी शिकतो. महाराष्ट्र माझा आहे, असे ते मराठी भाषेच्या एका प्रश्नावर म्हणाले.मोदींचे समर्थन करणाऱ्या मुलायम सिंग यांच्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, अखिलेश यादव हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. तिकीटवाटप तेच करणार आहेत, असे सांगून आझमी यांनी या विषयावर पडदा टाकला.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीMNSमनसेthaneठाणे