शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीबाबत निर्णय झाला नाही तर ‘खळ्ळखट्याक’! राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 08:59 IST

सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर ‘मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे : टोल बंद करण्यासाठी ‘मनसे’ने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोलनाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते,  त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. टोलवाढीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर ‘मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

टोल दरवाढीविरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुलुंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. 

ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोलनाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते, पण आम्हाला टोलनाक्याचे काय झाले, हे विचारले जाते. घोषणा करणाऱ्यांना  कोणी प्रश्न विचारत नाही.  एमएसआरडीसीच्या मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ मध्ये ॲग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले.  राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजिवडा उपशहरप्रमुख पुष्कर विचारे यांनीही उपोषणाची सांगता केली. मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवींद्र मोरे यासह बहुसंख्येने मनसैनिक उपस्थित हाेते.

रहिवाशांनी घेतली भेटलोढा, हिरानंदानी कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीही टोलमुक्तीसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज यांनी उपस्थित केलेले प्रश्न- रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला भरायचा ? टोल नाक्यावरून किती वाहने जातात आणि किती टोल जमा होतो, त्या रकमेचे काय होते?-  शिवसेना भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते,  त्याचे काय झाले?- ठाण्यातील सर्व पाच टोलनाके म्हैसकर यांचे आहेत. कोण म्हैसकर यांचे लाडके आहेत? - एकनाथ शिंदे यांनी टोलसंदर्भात याचिका का मागे घेतली?  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाकाMNSमनसे