शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मठात मूर्ती पूजन; सोशल मीडियातून भक्तांचा आवाहनाला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 09:15 IST

कोणतीही गर्दी न करता मंदिर प्रशासनातील निवडक पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांनी दोन्ही मठात स्वामींचा जयजयकार करत पूजन केले.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: लॉकडाऊन असले तरीही परंपरेप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील श्रीस्वामी समर्थ मठ, नंदिवली, तसेच श्रीगोविंदांनंद श्रीराम मंदिर या दोन्ही ठिकणी मंदिर, मठ प्रशासनाने मूर्ती, फोटोचे पूजन केले. श्रीस्वामी समर्थ सेवा मंडळाकडे स्वामींच्या निर्गुण पादुका असून त्याचेही विधिवत पूजन करण्यात आले. कोणतीही गर्दी न करता मंदिर प्रशासनातील निवडक पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांनी दोन्ही मठात स्वामींचा जयजयकार करत पूजन केले.मंदिर, मठ भक्तांसाठी उघडे नसून राज्य, केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. येथील श्रीराम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या भक्त मंडळींना सहज दर्शन होईल अशा पद्धतीने मंडळाने उघडे ठेवले आहे. परिसरातील भक्त, पोलीस मंडळी, राज्य शासनाचे कर्मचारी त्यांच्या वेळेनुसार बाहेरून रस्त्यावरून दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत असल्याचे निदर्शनास आले.दिवसभर मंडळाच्या वतीने भक्तांना घरीच स्वामी पूजन, पद्यपूजन, मानसपूजा करण्यास आणि ज्यांना गुरुमंत्र असेल त्यानी गुरुमंत्र अथवा अन्य भक्तांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे. मंडळाचे संस्थापक कै. भालचंद्र उपाख्य अण्णा लिमये यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांच्या स्मृती दृक्श्राव्य स्वरूपात भक्तांना एकवण्यात येणारं आहेत. अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वामींसमवेत गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा मंडळाने संकल्प।सोडला असून त्या पहिल्या सत्रातील उपक्रम पूर्ण झाले असून समाजमाध्यमांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.