शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

हुश्श, अर्धी पाणीकपात मागे

By admin | Updated: May 7, 2017 06:07 IST

मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के

सुरेश लोखंडे/ लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करून ७ टक्के केल्याने उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा मात्र तुलनेने कमी सोसाव्या लागणार आहेत.गतवर्षी चांगला पाऊस होऊनही लागू केलेल्या १४ टक्के पाणीकपातीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांमधील गृहिणींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अचानक कपात ७ टक्क्यांवर आणल्याने महिलांना सुखद धक्का बसला आहे. आतापर्यंत महिनाभरात चार दिवस पाणीकपात लागू होती. आता महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना केल्या आहेत. पाणीटंचाईचा यापूर्वीचा कटू अनुभव लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यापासूनच वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे आवश्यक असल्यामुळे जादा पाणी उचलणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. पाण्याचे आॅडिट करून काही महापालिकांना दंडासह पाणी बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. सुमारे १० टक्क्यांपर्यंत जादा पाणी उचलण्यास अनुमती देताना महापालिकांनी त्या बदल्यात आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण निश्चित केले होते. डिसेंबरपासून ७ टक्के लागू केलेली पाणीकपात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के करण्यात आली. परिणामी, महिन्यातून चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. आता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ही कपात ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत दुप्पट साठा धरणात आहे. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या कडकडीत उन्हाळ्यात कपात कमी करून दिलासा दिला आहे. बारवी धरणासह उल्हासनदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची पाणीकपात ७ टक्क्यांनी कमी केली आहे. परिणामी, महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण एमआयडीसी, एमजेपी, शहाड-टेमघर आणि महापालिकांच्या पाणीपुरवठा यंत्रणांकडून अवलंबले जाणार आहे. निवडणूक काळात राजकीय नेत्यांनी कपात रद्द करून जादा पाणीपुरवठ्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. ‘शहरात येणारे जादा पाणी रहिवाशांऐवजी अवैध धंदे, बांधकामे, कारखाने, हॉटेलवाले यांना जात आहे’, असे खडे बोल गृहिणींनी राजकीय नेते व उमेदवार यांना सुनावले होते. कपात रद्द झाली असली तरी नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्याएवढेच पाणी आताही उचलावे लागणार आहे. त्यानुसार, आम्ही महापालिकांना पाणीपुरवठा करीत आहोत.- विवेकानंद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, शहाड-टेमघरपाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दनघमीमध्ये आजचा साठा, टक्केवारी आणि मागील वर्षी आजच्या दिवसाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी धरणएकूण साठा आजचा साठायंदाची % मागीलवर्षाची %भातसा९४२.१०४१२.७८४३.८१३७.२२मोडक१२८.९३८२.२८६३.८२१२.४६तानसा१४५.०८४८.२८३३.२८३०.१८बारवी१८०.०३१०२.११४३.८११९.९१आंध्रा३३९.१४९६.००२८.३११४.५२