शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा मित्राच्या मदतीने पत्नीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:50 IST

विवाहानंतर रायगड येथील एका मित्राशी अनैतिक संबंध ठेवणा-या पत्नीला विरोध केल्यामुळे ठाणे महापालिकेतील सफाई कामगार पती गोपी नाईक यालाच महेश कराळे या मित्राच्या मदतीने प्रिया या पत्नीने खून केल्याची घटना घोडबंदर रोड येथे शनिवारी घडली. दोन्ही आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत.

ठळक मुद्देठाण्याच्या घोडबंदर रोडवरील घटनाघटनेनंतर दोघेही पसारकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या गोपी किसन नाईक (३०) या आपल्याच पतीचा महेश कराळे (२८, रा. नेरळ, जि. रायगड) या मित्राच्या मदतीने प्रिया नाईक (२८) हिने खून केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून खुनानंतर पसार झालेल्या या दोघांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफाल्य आवास या टीएमसी बिल्डिंग मधील तिसºया मजल्यावर राहणा-या ठाणे महापालिकेतील सफाई कामगार गोपी नाईक याला २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याची पत्नी प्रिया हिने दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेतील ही व्यक्ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितल्यानंतर ती तिथून पसार झाली. ही महिला पसार झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी कळवा, आतकोनेश्वरनगर येथे राहणारा गोपीचा भाऊ दिलीप याच्याकडे चौकशी केली. तेंव्हा त्याने भावाचा मृतदेह ओळखला. डाव्या पायाने लुळा आणि डोक्याला गंभीर जखम तसेच डोक्याची भुवई, कानाचे मागे, मानेवर, हाताचा कोपर, पायावर अशा अनेक ठिकाणी खरचटलेल्या खुणा आढळल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोपीची पत्नी प्रिया हिने तिच्या मित्रासह गोपीला जखमी अवस्थेत आणल्याचेही दिलीपने दिलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले. अधिक चौकशीमध्ये तिसºया मजल्यावरील सदनिका क्रमांक तीनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने पाहणी केली असता, बेडरुमच्या टाईल्सवर, बाल्कनीच्या टाईल्सवर आणि बेडवरही ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले. तसेच फ्लॅट समोरील तिसºया मजल्याच्या पॅसेजमध्ये तिस-या माळ्यापासून ते तळमजल्यापर्यंत पाय-यांवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले. या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्येही २९ डिसेंबर रोजी पहाटे ३.५० वा. च्या सुमारास प्रिया आणि तिचा मित्र गोपीला जखमी अवस्थेत घेऊन जातांना आढळले. या आधारे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी प्रिया आणि तिचा साथीदार महेश कराळे यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून