शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

आतेभावाच्या मदतीने पतीची हत्या; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:28 IST

१३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, यापूर्वीही दोनवेळा मारण्याचा प्रयत्न

मीरा रोड : आतेभावाशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढणाऱ्या पत्नीसह प्रियकर आतेभावास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने दोघाही आरोपींना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पतीचे परस्त्रीसोबत अनैतिक संबंध आणि दागिन्यांच्या चोरीचा बनावदेखील या दोघांनी रचल्याचे उघड झाले आहे. या आधी दोनवेळा त्यांनी पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील एनजी स्प्रिंग इमारतीत प्रमोद अनंत पाटणकर (४३) हे पत्नी दिप्ती (३६) आणि ९ वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. १५ जुलै रोजी प्रमोदचे सासरे भानुदास भावेकर यांनी नवघर पोलीस ठाण्यात आपले जावई घरात मृतावस्थेत पडले असल्याचे कळवले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय होता. परंतु प्रमोदच्या मान, गळा, छातीवर निळसर व्रण, तसेच नाकातून रक्त येत असल्याने त्यांच्या हत्येची शक्यता वाटू लागली.सहायक पोलीस निरीक्षक साहेब पोटे आणि पोलीस नाईक रवींद्र भालेराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता बेडवर गर्भनिरोधकची पाकिटे, चहाच्या कपावर लिपस्टीकची वेडीवाकडी छाप, तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरातून सोन्याची चेन, पेंडल, प्रमोद यांचा मोबाइल आणि २ हजार रोख असा ऐवज चोरीस गेला होता. कपावरील लिपस्टीकची वेडीवाकडी छाप निरखून पाहिली असता ती महिलेची नसल्याचे जाणवले.प्रमोदचे परस्त्रीशी अनैतिक संबंध होते व त्यातूनच हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु पोलिसांना प्रमोदचे भाऊ व आई, वडिलांकडून दिप्तीचे तिचा आतेभाऊ समाधान उद्धव पाषाणकर (४०, रा. पाषाण, पुणे) याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले.प्रमोदच्या नातलगांनी दिप्ती आणि समाधान यांनी हत्या केल्याचा संशय वर्तवला. रखवालदारासह शेजारी राहणारे अमोल डुमणे यांनीदेखील सकाळी समाधान हा घरी आल्याचे व दिप्तीने त्याला दार उघडून आत घेतल्याचे सांगितले. त्यातूनच पोलिसांनी पत्नी दिप्ती व समाधानची चौकशी केली. मोबाईलचे लोकेशन, तसेच खबरी व अन्य तांत्रिक विश्लेषणावरुन पोलिसांनी दिप्तीसह समाधान याला अटक केली.प्रमोद हा एलआयसीमध्ये, तर दिप्ती मुंबईच्या एका शाळेत लिपीक म्हणून नोकरी करते. दोघांचे लग्न २००७ साली झाले होते. समाधानला पत्नी व दोन मुली आहेत. समाधान हा पुण्यात बजाज फायनान्समध्ये वसुली अधिकारी आहे. २०१४ पासून दिप्ती आणि समाधानचे अनैतिक संबंध होते. प्रमोदला याची कुणकुण लागल्याने त्यावरुन वाद सुरु होता. त्यातूनच दिप्ती व समाधान यांनी प्रमोदचा कायमचा काटा काढायचे ठरवले. झोपेच्या गोळ्या देवून प्रमोदला मारायचे त्यांनी ठरवले. त्यानुसार दोनवेळा प्रमोदला चहामधून झोपेच्या १० गोळ्या दिल्या होत्या. पण त्याचा प्रमोदवर परिणाम न झाल्याने दोघांचा डाव हुकला.चहामध्ये टाकल्या झोपेच्या २० गोळ्या१४ जुलै रोजी दिप्तीने मुलीला गोल्डन नेस्ट भागात राहणाºया आपल्या आई-वडिलांच्या घरी सोडले. १५ जुलै रोजी सकाळी सव्वासातच्यादरम्यान प्रमोदसाठी चहा बनवून त्यामध्ये झोपेच्या २० गोळ्या टाकल्या. त्याचा परिणाम होऊन प्रमोदची शुध्द हरपली.त्यावेळी बाहेरच दबा धरुन बसलेल्या समाधानला घरात बोलावले. समाधानने प्रमोदच्या गळ्यावर उशी ठेऊन कापडी दोरीने गळा आवळला. त्यानंतर नाक आणि तोंडावर उशी दाबून दोघांनी त्याची हत्या केली. हत्या केल्यावर दिप्ती कामाला जायचे म्हणून निघून गेली. .समाधानने उशीखाली गर्भनिरोधकाची पाकीटं ठेवली. चहाचा आणखी एक कप ठेवत स्वत:च्या ओठाला लिपस्टीक लावून त्याचा ठसा कपावर उमटवला. कपाटातील ऐवज घेऊन समाधान निघून गेला. आरोपींना पकडण्यात अन्य अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले.

टॅग्स :Murderखून