शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 06:51 IST

मनोर-पालघर मार्गावर तामसाई फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे असून माती रस्त्यावर आल्याने मोटरसायकल घसरून एका विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून उपचारांसाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोर - मनोर-पालघर मार्गावर तामसाई फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे असून माती रस्त्यावर आल्याने मोटरसायकल घसरून एका विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून उपचारांसाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कैलास बाबुराव कडू (३३) हा बहाडोलीवरून आपल्या पत्नीला कामावर सोडण्यासाठी कुणाल कंपनी तामसाई येथे सकाळी मोटरसायकलवर जात असताना हा अपघात झाला. तामसाई फाट्याजवळ रस्त्यावर माती असल्याने त्याची गाडी घसरली आणि समोरून येणाऱ्या मोटर वाहनाची ठोकर लागल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आणि त्याचे जागीच निधन झाले. त्याची पत्नी गंभीर आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला आहे. मनोर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत. दरम्यान, मनोर-पालघर रस्त्याच्या बाजूला साईटपट्टीचे काम सुरू असून दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे असल्याने ती माती रस्त्यावर आली आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ये-जा करणारे दुचाकी व चारचाकी व अवजड मोटर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईट पट्टीवर मातीभराव टाकून काम सुरू केले असेल तर त्या ठेकेदाराला पत्र पाठवून कारवाई करू. हे त्यांनी चुकीचे केले आहे. एका बाजूची साईटपट्टी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूचे काम करायला पाहिजे, असे  एन एच आय. अधिकारी पिंपळकर यांनी सांगितले. 

मातीभराव टाकून काम दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईट पट्टीवर मातीभराव टाकून काम सुरू केले असेल तर त्या ठेकेदाराला पत्र पाठवून कारवाई करू. हे त्यांनी चुकीचे केले आहे. एका बाजूची साईटपट्टी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूचे काम करायला पाहिजे, असे  एन एच आय. अधिकारी पिंपळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात