शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घाणेकर नाट्यगृहासमोरील स्टॅण्डवर होर्डिंग कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 03:08 IST

पुण्यातील पुनरावृत्ती टळली : नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष

ठाणे : सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील होर्डिंग कोसळून चार जणांचे बळी गेल्यानंतर ठाण्यातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले होते. त्यानंतर, महिनाभराने पालिका प्रशासनाने ठाण्यातील सर्व जाहिरात फलक सुरक्षित असल्याचा दाखला दिला होता; मात्र असे असतानाही बुधवारी दुपारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील जाहिरात फलक कलंडला असून खाली सायकल स्टॅण्ड असल्याने तो कोसळला नाही. स्टॅण्ड नसते, तर होर्डिंग खाली पडून जीवितहानी होण्याची शक्यताही होती.

पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाण्यातील होर्डिंग्जबाबत रान उठले होते. अनेक जाहिरात फलकांविरोधात लोकांच्या, रहिवाशांच्या तक्रारी आहेत. परंतु, पालिका आणि पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जांभळीनाका येथील आत्माराम टॉवर या इमारतीत असलेल्या डिजिटल फलकाबाबत तेथील रहिवाशांनी तक्रार केली. मागील महासभेतदेखील घाणेकर नाट्यगृहासमोरील जाहिरात फलकांबाबत चर्चा झाली होती. परंतु, पालिका प्रशासनाने त्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. सुदैवाने खाली सायकल स्टॅण्ड असल्याने हे जाहिरात फलक तुटून या स्टॅण्डवर अडकून राहिले. अन्यथा, अपघात होण्याची दाट शक्यता होती. दरम्यान, हा कलंडलेला जाहिरात फलक पालिकेने सुरक्षितपणे खाली काढण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे धोका टळला होता.अद्याप धोकादायक‘लोकमत’मध्येही धोकादायक होर्डिंग्जबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, जागे झालेल्या ठामपा प्रशासनाने या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांनाच दिले होते. त्यानंतर, एक महिन्याने ठामपा प्रशासनाने शहरातील सर्व होर्डिंग्ज सुरक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही शहरातील अनेक होर्डिंग्ज धोकादायक आहेत.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात