शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:45 IST

उल्हासनगरातील अनेक भागांना पुराचा फटका, शेकडो जण बेघर, महापालिका शाळेत आश्रय

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील वालधुनी नदी किनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतीयानगर आदी परिसरतील शेकडो जणांना उल्हास नदीच्या ब्लॅक पाण्याचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने, त्यांच्यात एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी बोट रबरी ट्यूबने बाहेर काढण्यात आले. 

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान उल्हास नदीचे काळे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतीयानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने, नागरिकांत पळापळ सुरू झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने धाव घेऊन पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काढण्यात आले. महापालिका शाळे मध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना राहणे व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली असून अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, टीव्ही व इतर इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. आता जगायचे कसे? असा प्रश्न शेकडो नागरिका समोर उभा ठाकला असून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांत वृद्ध, लहान मुले, बिमार नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेनेही मदतीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. महापालिका बेघर झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

सामाजिक संस्था व दानशूरांनी पुढे यावे- उपमहापौर शहरातील शेकडो जनाला पुराचा फटका बसला असून अश्यावेळी शासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे यावे. असे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. महापालिका पुराचा फटका बसलेल्या नागरिकां सोबत असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भालेराव म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस