शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांनी शिवसेनेच्या गडाला पाडले मोठे खिंडार; ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 14:44 IST

सावरकर-कारवालो, लोकमान्य नगरात भाजप-  शिवसेनेला खिंडार ; मयूर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)- लोकमान्य, सावरकर-करवालो नगरमध्ये भाजप,  शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे पदाधिकारी मयूर शिंदे यांच्यासह त्यांच्या शेकडो भाजप आणि शिवसेनेच्या  कार्यकर्त्या‍ंनी रविवारी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक अमीत सरैय्या उपस्थित होते. 

मयूर शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा सावरकर-करवालो, लोकमान्य  नगरात दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक कार्यपद्धती कार्यकर्त्यांना उभारी देणारी असल्याने त्यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून मयूर शिंदे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी तसेच अनेक शिवसैनिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे सुमारे ५० महिलांचाही त्यामध्ये समावेश आहे. या सर्वांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज देऊन त्यांना आनंद परांजपे यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, मा. परिवहन सदस्य संतोष पाटील, उपस्थित होते. अन्नू आंग्रे, राजा जाधवर, संदीप घोगरे आदी उपस्थित होते.

यावेळी गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, सर्वांना परिवर्तनाची अपेक्षा आहे. लोकांची कामे होत आहेत. लोकांना राष्ट्रवादीवर विश्वास आहे. आपले भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित आहेत, हे युवकांना समजत आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. युवकांची ही ऊर्जा नक्कीच परिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस