शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सीबीएसई शाळांचा शंभर टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:17 IST

सीबीएसई दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाण्यातील शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

ठाणे : सीबीएसई दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाण्यातील शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.न्यू होरायझन हायस्कूलमध्ये १६१ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ३९ विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार केली. या शाळेतील अ‍ॅड्री दास या विद्यार्थ्याने ९९.४ टक्के गुणांची कमाई करून शहरातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. लोकपुरम हायस्कूलमध्ये २०८ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ३२ असून, ४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांचा टप्पा गाठला. ९७.८ टक्के गुणांसह प्रणव कुलकर्णी आणि सुधिक्षा माल्या हे विद्यार्थी शाळेतून अग्रस्थानी आहेत. डीएव्ही स्कूलमध्ये ४१५ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९८.८ टक्के मिळवित गीतांजली जैन हिने प्रथम स्थान मिळवले. रेन्बो हायस्कूलच्या यंदाच्या पहिल्याच बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. ४३ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९६.६ टक्के गुणांसह आर्यन गुलानीने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले. अरुणोदय हायस्कूलनेही शंभर टक्के निकालाचे लक्ष्य गाठले. या शाळेचे ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ओजस तुरेकर याने ९६.६ टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळविले. केंद्रीय विद्यालयात ९० विद्यार्थी परिक्षेस पात्र असून शंभर टक्के निकाल मिळविण्यात शाळेला यश मिळाले आहे. रिती सिंग आणि टिएस व्यंकट नारायण हे ९७ टक्क्यांसह शाळेत अव्वल आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र