शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:17 IST

दुकानदारांची धावपळ; बदलापूर पालिकेची धडक कारवाई

बदलापूर : मागील काही महिन्यांपासून सातत्याने रखडत असलेली बदलापूरमधीलअतिक्रमणविरोधी कारवाई अखेर गुरुवारी पार पडली. या वेळी पूर्व भागातील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर पालिकेच्या कारवाईचा जोर पाहता गाफील असलेल्या दुकानदारांनी अचानक आपले नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी धावपळ सुरू केली. पुढील दोन दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले.बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांनी डोके वर काढले आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सातत्याने रखडत असल्याने अतिक्रमणे वाढत होती. पूर्व भागातून जाणाऱ्या काटई - कर्जत महामार्गाशेजारीही अशाच प्रकारचे अतिक्रमण वाढले होते. कंपन्यांचे शोरूम, हॉटेल्स, दुकानांचे शेड बेकायदा उभे केले जात होते. तर अनेक बांधकामे थेट अर्धवट रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. यावर कारवाईसाठीही यापूर्वीच्या मुख्याधिकाºयांनी हात आखडता घेतला होता. मात्र मुख्याधिकारी बोरसे यांनी पूर्वेतील ७६८ अतिक्रमणांना नोटीस दिली होती. त्यानुसार एकदा रखडलेली कारवाई अखेर गुरुवारी झाली. पूर्वेतील वेंकीस हॉटेलच्या अतिक्रमणापासून कारवाई सुरू होत पुढे घोरपडे चौकापर्यंत आली. या वेळी कित्येक वर्षे जुन्या अतिक्रमणांवर पहिल्यांदा कारवाई झाली. बोरसे यांच्याबरोबरच नगररचनाकार, शहर अभियंते, इतर विभागाचे अधिकारी, सफाई कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या कारवाईसाठी मागवण्यात आला होता. कारवाईदरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी नागरिकांना दूर ठेवण्यात आले होते. तर महामार्गावरची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही फौज तैनात केली होती. यापूर्वी अनेक कारवायांमध्ये घोरपडे चौक ते शिरगाव प्रवेशद्वारापर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या नोटिसीनंतरही दुकानदार निर्धास्त राहत होते.दुकानदारांनीही केले सहकार्यगुरुवारी सुरू झालेल्या कारवाईचे स्वरूप पाहता सकाळी १०नंतर अचानक सर्वच दुकानदारांनी आपापली अतिक्र मणे काढण्यास सुरुवात केली.अनेक दुकानदारांनी स्वखर्चाने जेसीबी मागवत बांधकाम तोडले. ही कारवाई दोन दिवसांत पूर्ण करून अतिक्र मणे काढली जातील, असे बोरसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदलापूर-कर्जत महामार्ग अखेर मोकळा श्वास घेणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणbadlapurबदलापूर