भिवंडी - भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीत सुमारे 12 ते 15 गोदामे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाचे जवान सहा बंबांसह आग शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गोदामांमध्ये तेलाचा साठा असल्याने ही आग अधिक भडकल्याचे सांगण्यात येत आहे.
भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 06:29 IST